Agriculture news in marathi provide nutritious fodder to goats | Agrowon

शेळ्यांना द्या सकस आहार...

योगेश पाटील
शनिवार, 18 जुलै 2020

शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पौष्टिक, संतुलित तसेच सकस आहार व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात कर्बोदके, प्रथिनांचे योग्य प्रमाण असावे. हिरवा चारा, सुका चारा व खुराक यांची आहारात योग्य मात्रा असावी.
 

शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पौष्टिक, संतुलित तसेच सकस आहार व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात कर्बोदके, प्रथिनांचे योग्य प्रमाण असावे. हिरवा चारा, सुका चारा व खुराक यांची आहारात योग्य मात्रा असावी.

शेळीच्या वजनास विशेष महत्त्व असते. त्यामुळे कमी कालावधीत जास्त वाढीसाठी त्यांना संतुलित आहार द्यावा. त्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी पौष्टिक, संतुलित तसेच सकस आहार व मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. आहारात कर्बोदके, प्रथिनांचे योग्य प्रमाण असावे. हिरवा चारा, सुका चारा व खुराक यांची आहारात योग्य मात्रा असावी. कर्बोदकांसाठी कडबा (ज्वारी, बाजरी इ.) तर प्रथिनांच्या पूर्ततेसाठी कडधान्ये भुसा व पेंड्यांना प्राधान्य दिले जाते. उदा. चवळी, मूग, हरभरा, तूर या पिकांच्या भुसकट व टरफलांना प्रथिनांचा स्त्रोत म्हणून ओळखले जाते. हिरव्या चाऱ्यापासून कर्ब व प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात. ल्युसर्न, बरसीम, लसूण गवत, मका, चवळी या पिकांचा समावेश आहारात करणे फायद्याचे ठरते. अतिरिक्त खुराक म्हणून पेंड किंवा पशूखाद्य पुरविणे आवश्‍यक आहे. आहारात भुईमूग पेंड, सरकी पेंड, अझोला, पशूखाद्याचा वापर करणे फायदेशीर ठरते.

चारा पिके 

एकदल वर्गीय गवत  द्विदल वर्गीय गवत  कोरडा चारा पारंपरिक झाडे
मारवेल   ल्यूसर्न  ज्वारी कडबा बोर
मका-३ बरसीम  तुरभुसा     वड
सीओ-४     चवळी हरभरा भुसा आपटा
फुले जयवंत  शेवरी सोयाबीन भुसा पिंपळ
 पॅरा गवत दशरथ  भुईमूग वेल   जांभूळ

        
लसीकरणाचे वेळापत्रक

लसीचे नाव  रोगप्रतिकार शक्तीचा काळ
पी. पी.आर ३ वर्षे (दरवर्षी दिल्यास उत्तम)
आंत्रविषार  दर ६ महिन्याने (३ आठवड्यांनी बुस्टर)
लाळ्या खुरकूत+ घटसर्प १ वर्ष (एकत्र किंवा वेगवेगळी)
धर्नुवात  दर ६ महिन्याने
देवी १ वर्ष

   

  • पिल्लाचे वय ३ ते ४ महिने झाल्यावर ३ आठवड्याच्या अंतराने खालीलप्रमाणे लस द्याव्या.
    पीपीआर—› आंत्रविषार—›  आंत्रविषार बुस्टर—›  लाळ्या खुरकत—›  घटसर्प—›  धनुर्वात —› देवी
  • लसीकरणाबरोबरच जंतुनाशक आणि बाह्य परजिवींच्या निर्मूलनाकडे लक्ष देणे ही  महत्त्वाचे असते.

संपर्क- योगेश पाटील, ७५८८७६१४४८
(पशुसंवर्धन व दुग्धशास्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली,जि.रत्नागिरी)


इतर कृषिपूरक
जनावरांच्या खुराकात मिसळा ॲझोलाजनावरांच्या आहारात संकरित नेपिअर, सुबाभूळ, चवळी,...
व्यवस्थापन गाभण शेळ्यांचेशेळीपालनाचे उत्पन्न कळपामध्ये जन्माला येणाऱ्या...
धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्रधिंगरी आळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा...
जनावरातील सर्पदंशाचे निदान अन्‌ उपचार सध्याच्या काळात चराईला जाणाऱ्या जनावरांच्यामध्ये...
गाभण शेळी तपासणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानशेळी गाभण झाल्यानंतर शरीरात विविध बदल होतात....
मधमाशीपालनातून मिळवा प्रोपोलिस, रॉयल...प्रोपोलिस मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत....
मधमाशी पालनामध्ये मोठी व्यावसायिक संधीमधमाशी पालनामध्ये मधाच्या बरोबरीने सात विविध...
पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचे व्यवस्थापनपावसाळ्यामध्ये वातावरणातील दमटपणा वाढलेला असतो....
`मनरेगा‘च्या माध्यमातून पशुसंवर्धन योजनाग्रामीण भागात राहणाऱ्या अकुशल कामगारांना गावातच...
स्वच्छ दूध निर्मितीसाठी उपाययोजनागोठा नेहमी स्वच्छ, कोरडे, खाच खळगेविरहित असावा....
प्रयोगशाळांतून होईल पशू आजाराचे योग्य...जनावरांचे आरोग्य अबाधित राखणे, जनावरातील आजारांचे...
स्वच्छ दूधनिर्मितीवर लक्ष द्यादुधाची प्रत ही दुधातील फॅट, एस.एन.एफ.चे प्रमाण...
नवजात वासराची घ्यावयाची काळजीआरोग्याच्या दृष्टीने वासराचे जीवन हे  पहिले...
गोड्या पाण्यातील कोळंबी संवर्धनकोळंबी संवर्धनासाठी तलावाचे क्षेत्रफळ ०.१ ते ०.२...
जनावरांतील सर्पदंशांवर प्राथमिक उपचारसर्पदंश झालेले जनावर बेचैन होते.हालचाल करत नाही....
जनावरांच्या आजाराकडे नको दुर्लक्षपशूतज्ज्ञ आजार निदानासाठी जनावर आजारी असतानाची...
शेळ्यांना द्या सकस आहार...शेळ्यांच्या विविध शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी...
बायोफ्लाक मत्स्यपालनाचे तंत्रबायोफ्लाक तंत्रज्ञानातील महत्त्वाचे घटक म्हणजे...
व्यवस्थापन गाई-म्हशींचेसाधारणपणे गाई,म्हशींचा गाभण काळ अनुक्रमे २८० ते...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...