ग्रामीण भागात ‘रोहयो’ची कामे उपलब्ध करून द्या ः भापकर

ग्रामीण भागात ‘रोहयो’ची कामे उपलब्ध करून द्या ः भापकर
ग्रामीण भागात ‘रोहयो’ची कामे उपलब्ध करून द्या ः भापकर

हिंगोली ः टंचाई स्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरित होत आहेत. स्थलांतरित नागरिकांची गावनिहाय माहिती तयार करावी. रोजगार हमी योजनेअंतर्गतची कामे गावात उपलब्ध करून द्यावीत. जिल्ह्यातील पशुधनाकरिता चारा-पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्याकरिता संरक्षित चाऱ्याचे योग्य नियोजन, पशुसंवर्धन तसेच कृषी विभागाच्या यंत्रणांनी समन्वयाने करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित टंचाई परिस्थिती आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. भापकर बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मणीयार, मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बनसोडे, सहायक आयुक्त (विकास) अनंत कुंभार, अधीक्षक कृषी अधीक्षक (रोहयो) पोपट शिंदे, सहायक संचालक (रेशीम) दिलीप हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. 

हिंगोलीत मंजूर १० हजार विहिरींची कामे लवकर पूर्ण करावीत. प्रत्येक तालुक्याला ग्रामसंपर्क अधिकारी नेमण्यात आला. आठवड्यातील एक दिवस सर्व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन गावातील प्रश्न मार्गी लावावेत. या वेळी श्री. महाजन यांनी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कालबद्ध कार्यक्रम तर श्री. हाके यांनी तुती लागवड विषयक सविस्तर माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com