अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘सेफ्टी किट’ विनामूल्य द्या ः वाघ

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘सेफ्टी किट’ विनामूल्य द्या ः वाघ
अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना ‘सेफ्टी किट’ विनामूल्य द्या ः वाघ

अकोला  ः ‘जिल्ह्यात फवारणीसाठी कीटकनाशके विक्री करणाऱ्या उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या विक्रेत्यांमार्फत शेतकऱ्यांना ‘सेफ्टी किट’ विनामूल्य उपलब्ध करून द्यावी,’ असे निर्देश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी कीटकनाशक उत्पादक कंपन्यांना दिले. प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशकांची विक्री करताना कुणीही विक्रेता आढळला तर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारासुद्धा त्यांनी दिला.  जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील कीटकनाशक विक्रेते व उत्पादक कंपन्यांसाठी बुधवारी (ता. २८) दुपारी विशेष कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेला अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, कृषी विद्यापीठाचे रोगशास्त्र व कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. लांडे, डॉ. कुलकर्णी, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी नितीन लोखंडे, कृषी विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे आणि कृषी सेवा केंद्र संघटनेचे अध्यक्ष श्री. मानकर उपस्थित होते.   मोनोक्रोटोफॉसची विक्री न करण्याचे आवाहन  जिल्ह्यात शेतकरी विषबाधेच्या सर्वाधिक घटना मोनोक्रोटोफॉस या औषधाच्या फवारणी वेळी होत असल्याचे समोर आलेले आहे. या कीटकनाशकाची विक्री विक्रेत्यांनी करू नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या. तसेच, तणनाशके फवारण्याचा पंप शेतकऱ्यांनी कीटकनाशकांच्या फवारणीसाठी वापरू नये असेही या वेळी सांगण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com