विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीची २५ टक्के भरपाई द्या

विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीची २५ टक्के भरपाई द्या
विमा घेतलेल्या शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीची २५ टक्के भरपाई द्या

परभणी ः दुष्काळी स्थितीमुळे परभणी तालुक्यातील रब्बी ज्वारीच्या क्षेत्रात झालेली ७५ टक्के पेक्षा अधिक घट विचारात घेऊन पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामात जिरायती क्षेत्रातील ज्वारी पिकांसाठी विमा संरक्षण घेतलेल्या परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्केपर्यंत नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी विमा कंपनीला सोमवारी (ता. १४) काढलेल्या अधिसूचनेद्वारे दिले आहेत. या संदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली.

दुष्काळी स्थितीमुळे पेरणीसाठी जमिनीत ओलावा नव्हता. त्यामुळे यंदा परभणी तालुक्यातील जिरायती क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीची पेरणी करता आली नाही. परभणी तालुक्यामध्ये रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ५६ हजार ५५५ हेक्टर आहे. परंतु यंदा १३ हजार ३०४ हेक्टरवर (२३.५२ टक्के) पेरणी झाली. यामध्ये परभणी आणि झरी महसूल गटामध्ये सरासरी क्षेत्र १४ हजार ४०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ३ हजार ४५५ हेक्टरवर (२३.९९ टक्के), पेडगांव आणि जांब मंडळ गटामध्ये ज्वारीचे सरासरी क्षेत्र ११ हजार ६५० हेक्टर असतांना प्रत्यक्षात २ हजार ८०२ हेक्टरवर (२४.०५ टक्के), सिंगणापूर मंडळामध्ये सरासरी क्षेत्र ८ हजार ९०० हेक्टर असतांना २ हजार १२८ हेक्टरवर (२३.९१ टक्के),  दैठणा मंडळामध्ये सरासरी क्षेत्र १३ हजार ६४० हेक्टर असतांना प्रत्यक्षात ३ हजार २९२ हेक्टरवर (२४.१३ टक्के), पिंगळी मंडळामध्ये सरासरी क्षेत्र ७ हजार ९६५ हेक्टरवर (२०.४३ टक्के) ज्वारीची पेरणी झाली. 

कमी पावसामुळे परभणी तालुक्यातील जिरायती क्षेत्रातील रब्बी ज्वारीच्या क्षेत्रामध्ये ७५ टक्केहून अधिक घट झाली. त्यामुळे अधिसूचित मंडळातील जिरायती क्षेत्रातील रब्बी ज्वारीसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्के पर्यंत नुकसान भरपाई देण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता.

त्यानुसार जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी अधिसूचित मंडळातील जिरायती क्षेत्रातील रब्बी ज्वारीसाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्केपर्यंत नुकसान भरपाई रक्कम जमा करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com