जतला ‘तुबची बबलेश्‍वर’मधून पाणी द्या : प्रकाश जमदाडे

जतला ‘तुबची बबलेश्‍वर’मधून पाणी द्या : प्रकाश जमदाडे
जतला ‘तुबची बबलेश्‍वर’मधून पाणी द्या : प्रकाश जमदाडे

जत, जि. सांगली : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराच्या पाण्याने वेढले होते. कोट्यवधीचे नुकसान झाले. मात्र, जत तालुका पाण्याअभावी दुष्काळाचा सामना करीत आहे. आजही ५९ गावे ४४० वाड्या-वस्त्यांवर टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. कर्नाटकशी चर्चा करून महाराष्ट्र शासनाने कर्नाटकच्या सीमाभागात सुरू असलेल्या तुबची बबलेश्वर योजनेतून जत पूर्व भागाला पाणी द्यावे. तालुक्‍याच्या पश्‍चिम, दक्षिण व उत्तर भागातील शेतकऱ्यांना म्हैसाळचे आवर्तन सुरू करून पाणी द्यावे, अशी मागणी पुणे रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश राव जमदाडे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

जमदाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. 

ते म्हणाले, ‘‘मान्सून सुरू होऊन दोन महिने झाले तरी तालुक्‍यात पावसाचा पत्ता नाही. लोकांना टॅंकरवर तर जनावरांना छावणीवर अवलंबून राहावे लागत आहे. शेतकरी, पशुपालक, शेती व्यवसाय, कष्टकरी, मजुरांवर बेरोजगारीचे संकट आहे. दुष्काळाने स्थलांतरित झालेली कुटुंबे आजही तालुक्‍यात फिरकली नाहीत.’’

ते म्हणाले, ‘‘कर्नाटक सीमा भागात तुबची बबलेश्वर योजनेतून पाणी सोडले जात आहे. ते झिरपून जत तालुक्‍यातील काही बंधारे तर काही विहिरीत येऊ लागले आहे. पाटबंधारे विभागाने यापूर्वीच तुबची बबलेश्वरचे पाणी नैसर्गिक पद्धतीने जत पूर्व भागात मिळू शकते, असा अहवाल केला आहे. त्याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्राने कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाशी समन्वयक साधून तुबची बबलेश्वर योजनेतून नैसर्गिक पद्धतीने दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. कर्नाटकातील समुद्रहट्टी व टकळगीतून तिकोंडी, कागनरी परिसरात पाणी आले आहे. तेच पाणी ओहर फ्लो होऊन जत हद्दीत आल्यास संख, तिकोंडी, भिवर्गी, धुळकरवाडी, मोटेवाडीतील तलाव, साखळी बांध, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरता येतील. टॅंकरने पाणी पुरवणाऱ्या शासनावरील ताण कमी होईल. एक पैसाही खर्च न करता हे पाणी सहज मिळू शकते. त्याबदल्यात महाराष्ट्र सरकार कर्नाटकला चार टीएमसी पाणी देते. त्यामुळे कर्नाटकातील तुबचीचे पाणी जत पूर्व भागाला देण्यासाठी प्रयत्न करावा.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com