Agriculture news in marathi, Provincial labor support for cotton mines | Agrowon

कापूस वेचणीला परप्रांतीय मजुरांचा आधार

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

या वर्षी मी माझ्या १२ एकरांमध्ये कापसाची लागवड केली आहे. सध्या कापूस वेचणीला आला आहे. मजूर वेळेवर मिळत नसल्याने कापूस बोंडातून गळत आहे. नऊ ते दहा रुपये प्रतिकिलो देण्याची तयारी असूनही मजुरांसाठी ओढाताण सुरू आहे.
- राजेश दामोधर, कापूस उत्पादक शेतकरी, तरोडा

शेतीच्या कामांसाठी परप्रांतातील २० मजूर आमच्याकडे आहेत. त्यांना सर्व सोयीसुविधा द्याव्या लागत आहेत. मजूर मिळाले नाही, तर शेतातील पीक शेतातच राहते. आता कापूस वेचणीसाठी अशी स्थिती बनलेली आहे.
- नितीन साबळे, शेतकरी

अकोला : अकोट तालुक्यातील ग्राम तरोडा व परिसरात शेतकऱ्यांनी कापसाची सर्वाधिक क्षेत्रावर लागवड केली आहे. कापूस वेचणीला सुरुवात झाली असून, वेचणीचा दर आठ ते दहा रुपये प्रतिकिलो, असा द्यावा लागत आहे. एवढा दर देऊनही कापूस वेचणीसाठी मजुरांची मोठी अडचण सर्वत्र भेडसावत आहे.

जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र दीड लाख हेक्टरपर्यंत आहे. एकाच वेळी सध्या वेचणीच्या कामाने वेग घेतला आहे. वेचणीसाठी मजुरांची त्यामुळे गरज वाढली आहे. यावर्षी कापूस वेचणी पाच रुपयांपासून १० रुपयांपर्यंत पोचलेली आहे. बहुतांश गावांमध्ये आठ ते दहा रुपये प्रतिकिलो वेचाई द्यावी लागत आहे. कापूस हे नगदी पीक आहे. या खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी या सर्वच पिकांचे पूर्णतः नुकसान झालेले आहे. यातून वाचलेले कापसाचे पीकही आता वाढलेल्या मजुरीमुळे शेतकऱ्यांना परवडणारे राहिलेले नाही. कापसाची वेचाई ८०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल पडत असून कापसाला भाव मात्र ३५०० ते ४००० दरम्यान मिळत आहे.

वेचणीसाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात दर वाढला आहे. अतिपावसामुळे कापसाच्या बोंड्या काळ्या पडलेल्या आहेत. शिवाय कवडीचे प्रमाणही वाढलेले आहे. किडीने बोंड खराब केले. अशा बोंडातून कापसाची वेचणी मजुरांनाही अवजड जात आहे. त्यामुळे मजुरांकडून मजुरी वाढवून मागितली जात आहे. काही भागात सुरवातीला पाच रुपये प्रतिकिलो दराने वेचणी केली जात होती. मात्र आता मजुरांची मागणी वाढताच वेचाईचा दर सर्रास आठ ते दहा रुपये असा चुकवावा लागला आहे.

स्थानिक मजुरांसह परप्रांतातून आलेले मजूर या जिल्ह्यात वेचाईचे काम करीत आहेत. एकाचवेळी कापूस वेचणीला आल्याने अनेकांना मजूर मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशावेळी मजुरांना वाढीव दरसुद्धा देण्याची तयारी ठेवावी लागते आहे.
 


इतर बातम्या
भविष्यात देशी कपाशीला गतवैभव प्राप्त...परभणी: देशी कपाशीचे वाण रसशोषण करणाऱ्या किडीसाठी...
शेती उत्पादन वाढीसाठी मधमाश्‍यांचा मोठा...नाशिक: मधमाश्‍यांचे संगोपन करून त्यांच्या...
कृत्रिम रेतनावर नियंत्रण योग्यचपुणे : कृत्रिम रेतन करताना शास्त्रोक्त...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी २२७ कोटी...मुंबई: राज्यात जुलै ते ऑक्टोबर दरम्यान...
बेदाणा दरात वाढीचे संकेतसांगली ः दिवाळीनंतर बेदाण्याचे सौदे सुरु झाले...
पीकविमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लावा...पुणे: कृषी विभागाच्या कामकाजाची माहिती...
द्राक्षाचे ४० वाण आयात करणार : डॉ. ए....पुणेः शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
सुटीच्या दिवशीही बाजार समित्या सुरू ठेवापुणे: अवकाळी पावसाने लांबलेल्या शेतमालाच्या...
विदर्भापाठोपाठ खानदेशात थंडी वाढतेयपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे...
पणन महासंघाकडून ९ कोटी रुपयांचे चुकारेअमरावती ः राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस...
कडधान्यवर्गीय बियाणे उत्पादकांना अनुदान...अकोला  ः कडधान्यवर्गीय पिकांच्या पायाभूत...
नुकसानग्रस्तांना ५,३०० कोटींचा दुसरा...मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा...
अमरावती ‘एसआयटी’कडूनही अजित पवार निर्दोषमुंबई : नागपूर विभागातील सिंचन घोटाळ्यापाठोपाठ...
साहेब, शेतीसाठी दिवसा वीज द्या हो...अकोला  ः रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू...
नांदेड जिल्ह्यात कृषी योजनेंतर्गत १...नांदेड : जिल्हा परिषदेच्या कृषी...
पुणे विभागात गळीत हंगामात १८ साखर...पुणे : गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास दीड महिना होत...
खानदेशात ज्वारीची आवक नगण्य, दरही...जळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
नगर जिल्ह्यात पाण्याअभावी २४० पाणी...नगर : आक्टोबर महिन्यात जिल्हाभर जोरदार पाऊस...
जळगाव जिल्ह्यात सिंचनासाठी धरणांतून पाच...जळगाव  ः पावसाळ्यात सरासरीच्या तीस टक्के...
नगर जिल्ह्यात सरासरीच्या ३१ टक्के...नगर : जिल्ह्यामध्ये यंदा चांगला पाऊस झाल्याने...