राज्यातील जिरायती शेतीतील कापूस हे एकमेक नगदी पीक आहे.
बातम्या
गोंदिया जिल्ह्यात ‘जलयुक्त’साठी १४ कोटींची तरतूद
गोंदिया ः राज्य दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी होत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुमारे १६१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या माध्यमातून ही कामे होणार असून, त्यावर सुमारे १४ कोटी ४३ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने २०१८-१९ या वर्षात जलयुक्त शिवारची १७५ कामे प्रस्तावित होती. त्यातील १६१ कामे करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात गोंदिया तालुक्यातील ३४ पैकी २५ कामांचा समावेश आहे. यावर सुमारे २ कोटी १० लाख ८४ हजार रुपये खर्च होईल. गोरेगाव तालुक्यातील ९ कामांसाठी १ कोटी ५८ लाख ८९ हजार रुपये, तिरोडा तालुक्यातील ४१ कामांसाठी २ कोटी ३९ लाख ४ हजार रुपये, आमगाव तालुक्यात १७ पैकी १६ कामे होतील. त्यावर १ कोटी ३३ लाख ६५ हजार रुपये, देवरीमध्ये १८ पैकी १७ कामावर २ कोटी १२ लाख ८३ हजार रुपये, सडक अर्जुनी तालुक्यात १७ कामांवर १ कोटी ८४ लाख ८८ हजार, सालेकसा तालुक्यात १४ पैकी १२ कामांवर ५८ लाख ४२ हजार खर्च करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत २० लाख ८४ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. अर्जुनी मोरगाव तालुक्यात २५ पैकी २४ कामांसाठी ४४ लाख ४७ हजार रुपयांची तरतूद आहे.
त्या तालुक्यातील कामे केली रद्द
जलयुक्त शिवारची १७५ कामे प्रस्तावित होती. परंतु गोंदिया तालुक्यात ९ तसेच आमगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव या तालुक्यांत प्रत्येकी एक तसेच सालेकसा तालुक्यात दोन याप्रमाणे १४ गावांमध्ये पाण्याची पातळी वाढली. परिणामी या गावांमध्ये जलयुक्तच्या कामांची गरज नसल्याने ती रद्द करण्यात आली. त्यामुळे आता केवळ १६१ कामेच केली जाणार आहेत.
- 1 of 910
- ››