agriculture news in Marathi, A provision of Rs. 14 crores for 'Jalwani' in Gondia district | Page 2 ||| Agrowon

गोंदिया जिल्ह्यात ‘जलयुक्‍त’साठी १४ कोटींची तरतूद

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 जानेवारी 2019

गोंदिया ः राज्य दुष्काळमुक्‍त करण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी होत असलेल्या जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुमारे १६१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या माध्यमातून ही कामे होणार असून, त्यावर सुमारे १४ कोटी ४३ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

गोंदिया ः राज्य दुष्काळमुक्‍त करण्याच्या उद्देशाने अंमलबजावणी होत असलेल्या जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात सुमारे १६१ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या माध्यमातून ही कामे होणार असून, त्यावर सुमारे १४ कोटी ४३ लाख ३८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने २०१८-१९ या वर्षात जलयुक्‍त शिवारची १७५ कामे प्रस्तावित होती. त्यातील १६१ कामे करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात गोंदिया तालुक्‍यातील ३४ पैकी २५ कामांचा समावेश आहे. यावर सुमारे २ कोटी १० लाख ८४ हजार रुपये खर्च होईल. गोरेगाव तालुक्‍यातील ९ कामांसाठी १ कोटी ५८ लाख ८९ हजार रुपये, तिरोडा तालुक्‍यातील ४१ कामांसाठी २ कोटी ३९ लाख ४ हजार रुपये, आमगाव तालुक्‍यात १७ पैकी १६ कामे होतील. त्यावर १ कोटी ३३ लाख ६५ हजार रुपये, देवरीमध्ये १८ पैकी १७ कामावर २ कोटी १२ लाख ८३ हजार रुपये, सडक अर्जुनी तालुक्‍यात १७ कामांवर १ कोटी ८४ लाख ८८ हजार, सालेकसा तालुक्‍यात १४ पैकी १२ कामांवर ५८ लाख ४२ हजार खर्च करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत २० लाख ८४ हजार  रुपये खर्च झाल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात २५ पैकी २४ कामांसाठी ४४ लाख ४७ हजार रुपयांची तरतूद आहे. 

त्या तालुक्‍यातील कामे केली रद्द
जलयुक्‍त शिवारची १७५ कामे प्रस्तावित होती. परंतु गोंदिया तालुक्‍यात ९ तसेच आमगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव या तालुक्‍यांत प्रत्येकी एक तसेच सालेकसा तालुक्‍यात दोन याप्रमाणे १४ गावांमध्ये पाण्याची पातळी वाढली. परिणामी या गावांमध्ये जलयुक्‍तच्या कामांची गरज नसल्याने ती रद्द करण्यात आली. त्यामुळे आता केवळ १६१ कामेच केली जाणार आहेत.


इतर बातम्या
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
‘पोकरा’ प्रकल्पात कृषी यांत्रिकीकरणाचे...अकोला  ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...
लातूर, उस्मानाबादमध्ये २० तूर खरेदी...लातूर : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात हमी...
शेती करताना जैवविविधता जोपासणे आवश्यक...नाशिक : वाढत्या लोकसंख्येचा भार कृषी क्षेत्रावरही...
अकोला : तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणीत...अकोला  ः शासनाकडून हमी भावाने तूर खरेदीसाठी...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
भंडारा : शेतकरी किसान सन्मानच्या...भंडारा ः पंतप्रधान किसान सन्मान योजनेला वर्षभराचा...
कवठेमहांकाळ तालुक्यात पाणीसाठ्यात वाढसांगली  ः कवठेमहांकाळ तालुक्यात ऑक्टोबर...
खानदेशात कांदा लागवड सुरूचजळगाव ः खानदेशात कांदा लागवड सुरूच असून, सुमारे...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाला महत्त्व...नगर : ‘‘भारत हा जगातील सर्वांत मोठी लोकशाही...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...