agriculture news in marathi Provision of Rs. 3.26 crore for agriculture and animal husbandry in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात कृषी, पशुसंवर्धनासाठी सव्वातीन कोटींची तरतूद

टीम अॅग्रोवन
रविवार, 7 मार्च 2021

परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन, लघु सिंचन या संलग्न विभागाअंतर्गत विविध घटकांसाठी ३ कोटी २६ लाख ५२ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली.

परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन, लघु सिंचन या संलग्न विभागाअंतर्गत विविध घटकांसाठी ३ कोटी २६ लाख ५२ हजार रुपये निधीची तरतूद करण्यात आली. यंदा या विभागांसाठी ८८ लाख ४९ हजार रुपये वाढीव तरतूद केली आहे. विभागनिहाय महिलांसाठी राखीव निधीची तरतूद आहे. त्यामुळे यंदाचे जेंडर बजेट आहे,’’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे  उपाध्यक्ष अजय चौधरी यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या (कै) बाबूराव पाटील गोरेगावकर सभागृहात शुक्रवारी (ता. ५) आयोजित सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला विटेकर होत्या. मुख्यकार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, सभापती रामराव उबाळे, मीरा टेंगसे, शोभा घाटगे, अंजली आणेराव, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजूषा कापसे आदी सह सदस्य, विभाग प्रमुख उपस्थित होते.

२०२१- २२ या आर्थिक वर्षासाठी एकूण अपेक्षित महसुली जमेच्या शिलकीसह २४ कोटी ३५ लाख ८७ हजार ३३१ रुपये आणि एकूण अपेक्षित महसुली खर्च २४ कोटी ३४ लाख ६ हजार रुपये विचारात घेऊन १ लाख ३१ हजार ३३१ रुपये शिलकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक सादर केले. सन २०२०- २१ चे सुधारित अंदाज पत्रक आणि सन २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रकीय उत्पन्नातून सर्व विभागांच्या मागण्या, गरजा, स्वउत्पन्न लक्षात घेऊन तरतुदी प्रस्तावित केल्या आहेत. 

२०२०-२१ मध्ये १ कोटी २२ लाख ७६ हजार १०० रुपये उत्पन्न मिळाले. २०२१-२२ मध्ये ४ कोटी ३७ लाख २२ हजार ३३० रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. कृषी विभागातील विविध घटकांसाठी १ कोटी २ हजार रुपये, पशुसंवर्धन विभागासाठी १ कोटी ५ हजार रुपये, लघुसिंचन विभागाअंतर्गत १ कोटी २६ लाख रुपये निधीची तरतूद केली आहे.

पाणीपुरवठ्यासाठी ८० लाख राखीव

शिक्षण विभागासाठी १ कोटी ३५ लाख १ हजार रुपये, आरोग्य विभाग १ कोटी ५२ हजार रुपये, समाज कल्याण विभाग २ कोटी ३५  लाख ७० हजार रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी १ कोटी ४ हजार रुपये निधीच्या तरतुदीचा अंदाजपत्रकात समावेश आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी ८० लाख निधी राखीव ठेवण्यात आला.
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...