Agriculture news in Marathi Provision of Rs. 5 crore for 'Agriculture, Animal Husbandry' | Agrowon

‘कृषी, पशुसंवर्धन’साठी पावणेपाच कोटींची तरतूद

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 एप्रिल 2021

सोलापूर जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी ३९ कोटी ७ लाख, १७ हजार रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक मंगळवारी (ता. ३०) शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी ३९ कोटी ७ लाख, १७ हजार रुपयांचे प्रशासकीय अंदाजपत्रक मंगळवारी (ता. ३०) शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले. पंढरपूर-मंगळवेढा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने पदाधिकाऱ्यांऐवजी प्रशासनाने अंदाजपत्रक सादर केले. १० लाख ६९ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प आहे. त्यात कृषी विभागाला ३ कोटी ५० लाख रुपये तर पशुसंवर्धन विभागाला दोन कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांनी अर्थसंकल्पाची माहिती दिली. झेडपीच्या स्वउत्पन्नाचे सन २०२१-२२ चे मूळ अंदाजपत्रक ३९ कोटी ७ लाख १७ हजार रुपयांचे आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एकूण अर्थसंकल्पातील ५० टक्के निधीची कपात झाली होती. पण यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही कपात होणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केल्याने पदाधिकारी व सदस्यांना विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणार आहे.

सध्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्याने नावीन्यपूर्ण योजनांची माहिती प्रशासनाने खुली केली नाही. आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत अवलोकनासाठी अर्थसंकल्प सादर होईल.

सभापतींना एकच संधी
सार्वत्रिक निवडणुकीनंतर अर्थ समिती सभापती विजयराज डोंगरे यांनी २०१७ मध्ये पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतरही विविध कारणांमुळे प्रशासनाने अंदाजपत्रक सादर केले. पाच वर्षांमध्ये अर्थ सभापतींना फक्त एकदाच अर्थसंकल्प सादर करता आला.

७१ कोटी शिल्लक
शासनाने जिल्हा परिषदेला दिलेला ७१ कोटींचा निधी शिल्लक आहे. जिल्हा नियोजन मंडळ आणि सेस फंडाच्या निधीचा त्यात समावेश आहे. आरोग्य विभागाकडील चार कोटींचा निधी अखर्चित असल्याने शासनाकडे परत जाण्याची शक्यता आहे.

विभागनिहाय तरतुदी
प्रशासन- ४ कोटी १४ लाख, सामान्य प्रशासन- ४० लाख, आरोग्य- तीन कोटी, शिक्षण- पाच कोटी २७ लाख महिला व बालकल्याण- दोन कोटी ५६ लाख, ग्रामीण पाणीपुरवठा- दोन कोटी पाच लाख, कृषी विभाग- तीन कोटी ५० लाख,  पशुसंवर्धन- दोन कोटी ७१ लाख, समाज कल्याण- चार कोटी ४० लाख, लघुपाटबंधारे एक कोटी २५ लाख, बांधकाम नऊ कोटी ७७ लाख.


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...