सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी पुन्हा सुरू

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे बागांची छाटणी थांबली होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने छाटणीसाठी शेतकरी नियोजन करू लागले आहेत.
Pruning of grapes resumes in Sangli district
Pruning of grapes resumes in Sangli district

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे बागांची छाटणी थांबली होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने छाटणीसाठी शेतकरी नियोजन करू लागले आहेत. मात्र, शेतात साचलेल्या पाण्यामुळे द्राक्षावर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी  शेतकरी हवालदिल झाला आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून छाटणी सुरवात झाली होती. दुसऱ्या आठवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांनी छाटणी थांबवली होती. पण, सध्या द्राक्ष छाटणीस प्रारंभ झाला आहे. शेतकऱ्यांनी आगाप छाटणी न घेता सप्टेंबरमध्ये छाटणी घेण्यास पसंती दर्शवली आहे. 

तासगाव तालुक्यातील बोरगाव, निंबळक, राजापूर, तुरची, लिंब, शिरगाव या परिसरात सध्या या कामाची धांदल दिसून येत आहे. गतवर्षी परिसरातील बागायतदारांनी जुलै, ऑगस्टमध्ये आगाप छाटण्या घेतल्या होत्या. मात्र, पावसामुळे बागायतदारांवर छाटण्या मध्यंतरीच सोडून देण्याची वेळ आली. त्यामुळे बागायतदारांना गतवर्षी मोठा आर्थिक फटका बसला.यंदा शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत छाटणी घेण्यास सुरवात केली आहे. प्रत्येक  वर्षी या भागातून निर्यातक्षम द्राक्षे पिकवली जातात.

दरवर्षी बोरगाव परिसरात द्राक्ष उत्पादक सप्टेंबर महिन्यामध्ये आगाप छाटणी घेतात. मात्र यंदा कोरोना संकटकाळात द्राक्षांना मिळणारी बाजारपेठ व पावसाचा अंदाज घेत छाटण्याना विलंब झाला आहे. त्यामुळे बागायतदारांनी छाटण्या सुरू केल्या आहेत. परतीचा पाऊस, वातावरण बदल होत असल्याने शेतकरी सावध आहेत.- महादेव पाटील, द्राक्षबागयतदार.

अतिवृष्टीमुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले. सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारणी सुरू आहे. मात्र, शेतात पाणी असल्याने ट्रॅक्टरद्वारे फवारणी करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. - विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वायफळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com