नांदेड जिल्ह्यात स्वच्छतेसाठी डिजिटल व्हॅनद्वारे जनजागृती

नांदेड जिल्ह्यात स्वच्छतेसाठी डिजिटल व्हॅनद्वारे जनजागृती
नांदेड जिल्ह्यात स्वच्छतेसाठी डिजिटल व्हॅनद्वारे जनजागृती

नांदेड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व शाश्वत स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात डिजिटल व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिली.

रविवारी (ता. २) जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून डिजिटल व्हॅनचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही. आर. मेकाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी. एल. रामोड, महिला बाल विकास विभागाचे उप-मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही शिंनगे, डॉ. व्ही. आर. झिने, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे उपस्थित होते.

राज्य शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे ही व्हॅन जिल्ह्यात पाठवण्यात आली आहे. ती १५० गावांत जाणार आहे. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी आणि महिला बचत गटांना स्वच्छतेविषयक चित्रपट दाखवण्यात येईल. या मोहिमेत गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, मुख्याध्यापक, शिक्षक, महिला बचत गट, स्वंयसेवी संस्था आदींनी या व्हॅनचे स्वागत करावे, असे आवाहन काकडे यांनी केले.

शाश्वत स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, मैला गाळ, मासिक पाळी व्यवस्थापन, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, गटारमुक्त व शौषखड्डेयुक्त गाव आदीबाबत जनजागृती करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com