सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६ कोटी रुपयांची देयके थकीत 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची ५६ कोटी ७ लक्ष रुपयांची वीज देयके थकीत आहेत.
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६ कोटी रुपयांची देयके थकीत  Public water supply, streetlights Payments of Rs 56 crore in arrears
सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६ कोटी रुपयांची देयके थकीत  Public water supply, streetlights Payments of Rs 56 crore in arrears

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची ५६ कोटी ७ लक्ष रुपयांची वीज देयके थकीत आहेत. अखंडित वीजपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतींनी थकीत चालू वीज देयकांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.  महावितरणच्या सूत्रांनी सांगितले, सद्यःस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असून, थकबाकी वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम राबविली जाते आहे. ग्रामपंचायतींकडेही सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीज देयके थकली आहेत. त्या अनुषंगाने थकीत वीज देयकांचा निर्णय होईपर्यंत, ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची चालू वीज देयके स्वनिधीतून भरण्याचे ग्रामविकास विभागाने निर्देशित केले आहे. त्या संदर्भातील दिरंगाईस संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरण्यात येईल. 

...अशी आहे थकबाकी  कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची २२ कोटी ३७ लक्ष, तर पथदिव्यांची ७ कोटी ४० लक्ष रुपयांची चालू वीज देयके थकीत आहेत. सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची ११ कोटी ९२ लक्ष तर पथदिव्यांची १४ कोटी ३८ लक्ष रुपयांची चालू वीज देयके थकीत आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ग्रामपंचातींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची चालू व थकीत वीज देयकांची एकूण थकबाकी ३२१ कोटी ४९ लक्ष रुपये इतकी आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात १७५ कोटी १९ लक्ष तर सांगली जिल्ह्यात १४६ कोटी ३० लक्ष रुपये थकबाकी आहे.  ग्रामपंचायतींनी चालू वीज देयकांचा भरणा करावा, असे अपेक्षित आहे. या थकबाकी संदर्भात महावितरणने ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक यांना वेळोवेळी सूचित केले आहे. मात्र ग्रामपंचायतीकडुन अद्यापही चालू वीज देयके भरणेबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने वीजपुरवठा खंडितची कारवाई होऊ शकते. तरी ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा व पथदिव्यांचे चालू वीज देयकांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com