Agriculture News in Marathi Public water supply, streetlights Payments of Rs 56 crore in arrears | Agrowon

सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची  ५६ कोटी रुपयांची देयके थकीत 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 सप्टेंबर 2021

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची ५६ कोटी ७ लक्ष रुपयांची वीज देयके थकीत आहेत.

कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची ५६ कोटी ७ लक्ष रुपयांची वीज देयके थकीत आहेत. अखंडित वीजपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतींनी थकीत चालू वीज देयकांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

महावितरणच्या सूत्रांनी सांगितले, सद्यःस्थितीत महावितरण आर्थिक संकटात असून, थकबाकी वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. महावितरणकडून थकबाकी वसुलीसाठी थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम राबविली जाते आहे. ग्रामपंचायतींकडेही सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची वीज देयके थकली आहेत. त्या अनुषंगाने थकीत वीज देयकांचा निर्णय होईपर्यंत, ग्रामपंचायतींनी सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची चालू वीज देयके स्वनिधीतून भरण्याचे ग्रामविकास विभागाने निर्देशित केले आहे. त्या संदर्भातील दिरंगाईस संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरण्यात येईल. 

...अशी आहे थकबाकी 
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची २२ कोटी ३७ लक्ष, तर पथदिव्यांची ७ कोटी ४० लक्ष रुपयांची चालू वीज देयके थकीत आहेत. सांगली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांची ११ कोटी ९२ लक्ष तर पथदिव्यांची १४ कोटी ३८ लक्ष रुपयांची चालू वीज देयके थकीत आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ग्रामपंचातींकडे सार्वजनिक पाणीपुरवठा व पथदिव्यांची चालू व थकीत वीज देयकांची एकूण थकबाकी ३२१ कोटी ४९ लक्ष रुपये इतकी आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यात १७५ कोटी १९ लक्ष तर सांगली जिल्ह्यात १४६ कोटी ३० लक्ष रुपये थकबाकी आहे. 

ग्रामपंचायतींनी चालू वीज देयकांचा भरणा करावा, असे अपेक्षित आहे. या थकबाकी संदर्भात महावितरणने ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक यांना वेळोवेळी सूचित केले आहे. मात्र ग्रामपंचायतीकडुन अद्यापही चालू वीज देयके भरणेबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने वीजपुरवठा खंडितची कारवाई होऊ शकते. तरी ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा व पथदिव्यांचे चालू वीज देयकांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 


इतर बातम्या
‘शेतकरीवाटा वसुली’त चाळीस अधिकाऱ्यांची...पुणे ः राज्यात गाजत असलेल्या कथित अवजारे व...
तापमानात चढ-उतार सुरूचपुणे : राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच...
दहा वर्षाआतील वाणांनाच अनुदान द्यावेअकोला ः सध्या रब्बी हंगामात हरभरा व इतर पिकांच्या...
मॉन्सूनचा देशाला निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) देशाचा...
युरोपातील वादाचा तांदूळ निर्यातीवर...पुणे : भारतातून आयात केलेल्या तांदळापासून पिठी...
शरद पवार, नितीन गडकरी यांना ‘डॉक्टर ऑफ...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठातर्फे माजी...
शेती, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी संशोधन...परभणी ः कृषी विद्यापीठातून बाहेर पडणारे दहा ते...
तलाठी दप्तराची झाडाझडती जळगाव ः नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण...
पुण्यात रब्बी पेरण्यांना सुरुवातपुणे : परतीचा पाऊस गेल्याने पहाटेचा गारठा वाढू...
निवडणुकीत होणार महाविकास आघाडी? सांगली : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि...
जांभा गावाच्या संपूर्ण पुनर्वसनाचा...अकोला : मूर्तीजापूर तालुक्यातील काटेपूर्णा बॅरेज...
'रासाका' सुरू करण्याच्या आश्वासनाची...नाशिक : निफाड तालुक्यातील ''रासाका'' म्हणजेच...
खानदेशात कांदेबाग केळीची लागवड निम्मीचजळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी...
रिसोड, जि. वाशीम :‘पळसखेड’च्या अर्धवट... रिसोड, जि. वाशीम : शासनासह अधिकाऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यातील अतिरिक्त उसाबाबत मार्ग... नगर : नेवासे तालुक्यासह नगर जिल्ह्यातील...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत एक लाख...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या...
‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे...परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या...
निकृष्ठ दर्जाच्या धान खरेदीवर नियंत्रण...नागपूर  : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
आधार प्रमाणीकरणास १५ नोव्हेंबरपर्यंत...धुळे : ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
वन उद्यानाद्वारे जिल्ह्याच्या पर्यटन...नाशिक : ‘‘जिल्ह्याला धार्मिक, ऐतिहासिक या सोबतच...