Agriculture news in marathi; Publish a list of ineligible account holders of loan waiver in Buldana district | Agrowon

'बुलडाणा जिल्ह्यात कर्जमाफीच्या अपात्र खातेदारांची यादी प्रसिद्ध करा'
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

बुलडाणा : जिल्ह्यात सध्या पीक कर्जवाटपाची कार्यवाही सुरू असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडील अनेक नावे अपात्र यादीत आहे. त्या अनुषंगाने अपात्र यादीमधील खातेदारांची नावे तालुकानिहाय संबंधित तहसीलदार व सहायक निबंधक कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करावी. तसेच संबंधित बँक शाखांनी पीक कर्जवाटप मेळावे आयोजित करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने यंत्रणांना केली आहे. 

बुलडाणा : जिल्ह्यात सध्या पीक कर्जवाटपाची कार्यवाही सुरू असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांच्याकडील अनेक नावे अपात्र यादीत आहे. त्या अनुषंगाने अपात्र यादीमधील खातेदारांची नावे तालुकानिहाय संबंधित तहसीलदार व सहायक निबंधक कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करावी. तसेच संबंधित बँक शाखांनी पीक कर्जवाटप मेळावे आयोजित करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने यंत्रणांना केली आहे. 

याबाबत सहायक निबंधक व त्यांचे पथक संबंधितांचे कार्यालयात दर सोमवार व गुरुवार या दिवशी उपस्थित राहतील. या दिवशी शेतकऱ्यांचे कर्जवाटप व तक्रारींचे निवारण करतील. या दिवशी संबंधित तहसीलदार हे भेट देऊन नियंत्रण ठेवतील. तरी कर्जमाफीच्या याद्यांमधील अपात्र शेतकरी खातेदारांची माहिती तहसील कार्यालय, सहायक निबंधक कार्यालयात प्रसिद्ध करावीत, अशा सूचना करण्यात आली आहे. 

कर्जमाफी योजनेच्या तक्रार निवारणार्थ तालुकास्तरीय समित्या गठित
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेसंदर्भात असलेल्या तक्रारी निवारणार्थ तालुकास्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी योजनेच्या लाभासंदर्भात काही तक्रारी असल्यास सदर संबंधित तालुक्यातील समित्यांकडे द्याव्या, असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. या समित्यांचे अध्यक्ष संबंधित सहायक निबंधक असून, सहकार अधिकारी सदस्य सचिव आहेत. समितीत अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँकेचे प्रतिनिधी, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे प्रतिनिधी, तालुका लेखापरीक्षक सहकारी संस्था यांचा समावेश आहे.

तालुकास्तरीय समित्यांचे सदस्य व त्यांचे मोबाईल क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत :
खामगाव : सहायक निबंधक एम. ए. कृपलानी ९४२२१८४४९७, सहकार अधिकारी ए. एस. शास्त्री मो. ९६५७७६८९३५, तालुका लेखापरीक्षक वि. का. ठाकरे ९४२२९४६४४६, बँक निरीक्षक भानुदास मिरगे ७०२०२९५४८४ आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे रविकुमार ९८३४८३९०२०. 

देऊळगाव राजा : सहायक निबंधक आर. एल. राठोड ९४२३४२१३४५, बँक निरीक्षक एन. डी. कोल्हे ८८०६५८६२४३, एसबीआय शाखाधिकारी श्री. सुत्राळे ९०७५०१३४०७, उपलेखापरीक्षक पी. बी. कस्तुरे ८६०५३१३४९१ आणि सहकार अधिकारी एस. एस. भोईटे ८८८८३७४७७७.

मेहकर तालुका : प्रभारी सहायक निबंधक जी. आर. फाटे ७०५७४७३३७३, जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी व्ही. आर. झनक ९७६७४५५५३७, सेंट्रल बँक शाखा प्रबंधक अरुण डिकळे ७५०७७७४२१६, तालुका लेखापरीक्षक एच. एस. पाटील ९८८१८५१८२७, सहकारी अधिकारी जी. आर. फाटे ७०५७४७३३७३. 

जळगाव जामोद : सहायक निबंधक एस. पी. जुमडे ७३५०६७११५८, बँक निरीक्षक एस. एन. हेलोडे ९८८१४०७९६१, सेंट्रल बँक शाखा प्रतिनिधी आर. एफ. इनवाते ९८९०४९७२९३, तालुका लेखापरीक्षक व्ही. एम. लोखंडे ९७६७६९००७५, सहकार अधिकारी डी. आर. इटे ९८२२८३२४८०.

मलकापूर : सहायक निबंधक एम. ए. कृपलानी ९४२२१८४४९७, पी. एन. झळके ९९२२५८७८४९, तालुका लेखापरीक्षक अरुण पाटील ७३८५०३४४९९, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे पी. व्ही. बावस्कर ९८६०९७६५२२ आणि जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे आशिष देशमुख ९८२२८७८०३३.

इतर ताज्या घडामोडी
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
नगर जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना ३८३...नगर  : पावसाची रोहिणी, मृग, आर्द्रा,...
मराठवाड्यात हलक्या पावसाची हजेरीऔरंगाबाद, नांदेड : मराठवाड्यातील ३०९ मंडळांमध्ये...
महाजनादेश यात्रेत सावधगिरी म्हणून...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम पथकाची...कोल्हापूर : महापुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी...
सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांने तरुण...बीड : सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा...
कृषी संजीवनी प्रकल्पात पाच हेक्टरपर्यंत...मुंबई : जागतिक बँकेच्या अर्थसाह्याने राबविण्यात...
बदल्यांचा धूमधडाका सुरूचपुणे : राज्यात खरीप हंगाम शेवटच्या टप्प्यात...