जनतेला फसविणाऱ्या सरकारला सत्तेतून खेचा ः धनंजय मुंडे

जनतेला फसविणाऱ्या सरकारला सत्तेतून खेचा ः धनंजय मुंडे
जनतेला फसविणाऱ्या सरकारला सत्तेतून खेचा ः धनंजय मुंडे

बुलडाणा ः सर्वसामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ची स्वप्ने दाखवत सत्तेत अालेले केंद्र व राज्यातील हे सरकार खाली खेचण्यासाठी सोबत या, असे अावाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथे माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.

या वेळी विचारपीठावर जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, माजी खासदार सुखदेव काळे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, नानाभाऊ कोकरे, कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, ॲड. साहेबराव सरदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मंगलाताई रायपुरे, सभापती दिनकर देशमुख, गटनेते राम जाधव, रियाज खाँ पठाण यांच्यासह पक्षात प्रवेश घेणारे विनायक पडघान, आत्माराम कायंदे उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, की एकीकडे निवडणूक आली की मते मागताना वारस असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा अपमान होत असताना त्यावर भाष्यदेखील करायचे नाही, असला दुटप्पीपणा आपल्याला पटत नाही. संघर्षाचा वारसा आपण घेतलेला असल्याने मुंडे साहेबांचा अपमान आपण सहन करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, की आता शिवसेनेने वाघाचे चित्र काढून तिथे शेळीचे चित्र लावावे, एवढी दयनीय अवस्था शिवसेनेची झाली अाहे. या राज्यात सध्या कोणताच घटक समाधानी नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com