कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ 

देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून २०२०-२१ या चौदा वर्षांच्या काळात तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. उत्पादन १४७.६ लाख टनांवरून २४४.२ लाख टनांवर पोहोचले आहे.
tur moong urad
tur moong urad

पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून २०२०-२१ या चौदा वर्षांच्या काळात तब्बल ६५ टक्के वाढ झाली आहे. उत्पादन १४७.६ लाख टनांवरून २४४.२ लाख टनांवर पोहोचले आहे. तर २०२१ च्या खरिपात तूर, मूग आणि उडीद पेरणीला प्रोत्साहन देण्यासाठी ८२ कोटी रुपये किमतीचे २०.२७ पाकिटे मोफत वितरित करण्यात येणार आहेत. हा सर्व खर्च केंद्र सरकार करणार आहे. २०१६-१७ पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत ६४४ जिल्ह्यांत कडधान्य विकास कार्यक्रम राबविला जात आहे. 

कडधान्य आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार मागील १४ वर्षांपासून विविध उपक्रम राबवीत आहे. कडधान्य पेरणीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच उत्पादनवाढीसाठी प्रयत्न करत असून, उत्पादन आणि उत्पादकतेवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून २००७-०८ मध्ये १४७.६ लाख टन असणारे कडधान्य उत्पादन २०२०-२१ मध्ये २४४.२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. मुख्यतः २०१४-१५ पासून कडधान्य उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रित केले गेले. विविध राज्यांत विशेष कार्यक्रम राबविले गेले, कमी उत्पादकता असलेल्या राज्यांमध्ये केंद्रित योजना, भात उत्पादक क्षेत्रांवर भर, लागवड वाढलेल्या भात प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, आंतरपीक पद्धतीचा अवलंब सरकारने केला. तसेच ११ राज्यांत कडधान्य मूल्यसाखळी संवर्धन आणि विकासासाठी ११९ शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली. 

बियाणेवाटप आणि तूर, मूग उडीद लागवडीला प्रोत्साहन कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी त्रुटी शोधण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. हंगामात पीक लागवड आणि नंतर नव्या बियाण्यांच्या वापरासाठी शेतकऱ्यांना जिल्हापातळीवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  उत्पादकता वाढीला प्रोत्साहन  कडधान्य उत्पादनवाढीसाठी उत्पादकता वाढीला प्राधन्य दिले आहे. त्यासाठी उच्च गुणवत्ता आणि उत्पादकता देणाऱ्या बियाण्यांचा पुरवठा करण्यावर भर देण्यात आला आहे. २०१६-१७ मध्ये २४ राज्यांत १५० कडधान्य बियाणे केंद्रांची निर्मिती केली गेली. यात ९७ जिल्ह्यांत कृषी विज्ञान केंद्रे, ४६ कृषी विद्यापीठे आणि ७ भारतीय कृषी संशोधन परिषदांचा समावेश केला गेला. या माध्यमातून उच्च गुणवत्ता आणि उत्पादकता असणाऱ्या बियाण्यांच्या संशोधनावर भर देण्यात आला.  यंदा २०.२७ लाख बियाणे पाकिटे वाटणार  देशात तूर, मूग आणि उडीद लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार यंदा २० लाख २७ हजार ३१८ बियाणे पाकिटे शेतकऱ्यांना मोफत वाटले जाणार आहेत. यासाठीचा ८२ कोटींचा खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. यात तुरीच्या १३ लाख ५१ हजार ७१० पाकिटांचा समावेश आहे. या बियाण्याची उत्पादकता १५ क्विंटल प्रतिहेक्टरपेक्षा कमी नाही. तर मुगाच्या ४ लाख ७३ हजार २९५ बियाणे पाकिटांचा समावेश आहे. याची उत्पादकता १० क्विंटल प्रतिहेक्टरपेक्षा कमी नाही.  या राज्यांत तुरीला प्राधान्य  तूर लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी १३ लाख ५१ हजार ७१० पाकिटे केंद्र सरकार वितरित करणार आहे. या योजनेत केंद्राने ११ राज्यांचा समावेश केला आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, हरियाना, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या अकरा जिल्ह्यांतील १८७ जिल्ह्यांमध्ये तूर लागवड कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.  मुगाला आंतरपिकात प्रोत्साहन  मुगाचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार मुगाला आंतरपीक म्हणून प्रोत्साहन देणार आहे. यात ९ राज्यांचा समावेश करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाना, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या ९ राज्यांतील ८५ जिल्ह्यांमध्ये मूग लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.  उडीद उत्पादनवाढीचा प्रयत्न 

  • मागील १५ वर्षांत एक लाख उडीद बियाणे पाकिटांचे वाटप 
  • उडीद बियाण्याची उत्पादकता १० क्विंटल प्रतिहेक्टर 
  • उडीद बियाण्याचा ४ लाख हेक्टरवर वापर होणार 
  • केंद्र आणि राज्य सरकार मिळून योजनेचा विस्तार करू शकतात 
  • ६ राज्यांतील ६० जिल्ह्यांमध्ये उडदाचे आंतरपीक घेणार 
  • आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा योजनेत समावेश 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com