agriculture news in Marathi pulses rate hike in markets Maharashtra | Agrowon

डाळींच्या दरात दहा टक्के वाढ 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता डाळींच्या दरही वधारले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात तूरडाळ ९५ तर मूगडाळ १०५ रुपये किलोचे दर पोहोचले आहेत.

मुंबई : पालेभाज्या, कांदा, बटाटा यांसह आता डाळींच्या दरही वधारले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक बाजारात तूरडाळ ९५ तर मूगडाळ १०५ रुपये किलोचे दर पोहोचले आहेत. टाळेबंदी व अतिवृष्टी याचा पुरवठ्यावर परिणाम झाल्याने घाऊक बाजारात किलोमागे दहा टक्के दरात वाढ झाली आहे. 

तीन ते चार वर्षांपूर्वी डाळींच्या दरात मोठी वाढ झाली होती. गेल्या वर्षी यात काही प्रमाणात दर कमी होते. मात्र गेल्या वर्षी डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यात कोरोनाचे संकट आल्याने टाळेबंदीत आवक घटली. तर काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. यामुळे डाळींची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. परिणाम गेल्या महिन्यापासून डाळींचे दर वधारले आहेत. 

महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून मुख्यत्वे मुंबई कृषी उत्पन्न बाजारात डाळींची आवक होते. बाजारात डाळींचे दर किलोमागे १० ते १२ रुपयांनी वधारले आहेत. 

डाळींचे घाऊक दर (रुपये/किलो) 

डाळ पूर्वी आता 
तूर ८५ ९५ 
मूग ९५ १०५ 
हरभरा ५८ ६५ 

 

डाळींची आवक (क्विंटलमध्ये) 
ऑगस्ट 

डाळ २०१९ २०२० 
हरभरा २३,८४९ १५,६५३ 
तूर ५६,२४९ ३९,८७१ 
मूग ३२,२९५ १९,०५७ 

सप्टेंबर 

डाळ २०१९ २०२० 
हरभरा १५,१०७ १४,३७६ 
तूर ५०,४३३ ४५,८१५ 
मूग २४,८९७ २०,७५७ 

प्रतिक्रिया
कोरोना, टाळेबंदी आणि आता पावसामुळे बाजारात डाळींची आवक ५० टक्के कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींच्या किमती १० टक्के वधारल्या आहेत. पुढील ८ ते १० दिवसांनी पुन्हा डाळींच्या किमती स्थिर राहतील. 
- नीलेश वीरा, संचालक, धान्य बाजार समिती 


इतर अॅग्रो विशेष
खानदेशात साठवणूकीअभावी कापूस खरेदीत...जळगाव : खानदेशात शासकीय खरेदीला जसा वेग आला, तशी...
मतदानातून लोकनियुक्त सरपंचावर अविश्‍वास...नगर ः थेट जनतेतून निवडलेल्या म्हैसगाव (ता. राहुरी...
संत्र्याची शेतातच लिलावाने विक्री;...परभणी ः जिल्ह्यातील ढेंगळी पिंपळगाव (ता. सेलू)...
नांदेडमध्ये ३४ लाखांचा शेतीमाल घेऊन...नांदेड : शेतीमालाला बाजारात जास्तीचा भाव देतो असे...
राज्यातील मातीत गंधक, जस्त, लोह,...अकोला ः हरितक्रांतीनंतर जास्त उत्पादन देणाऱ्या...
जमीन सुपीकता निर्देशांक आता एका क्लिकवरपुणे ः शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल अशी...
शेतकऱ्याची व्याख्या, वर्गीकरणाची गरज ः...पुणे ः शेतकऱ्यांच्या नावाखाली अनेक धनदांडगे...
टॉवरचा भुलभुलैया, लाखोंचा गंडाकऱ्हाड ः शेतात टॉवर बसवण्यासाठी संपर्क करा, अशा...
आज पुन्हा चर्चा; मंगळवारी भारत बंदनवी दिल्ली ः केंद्राचे तीनही कृषी कायदे...
बुरेवी चक्रीवादळ निवळू लागले; थंडी...पुणे ः बुरेवी चक्रीवादळ तमिळनाडू व आंध्र...
माती जीवंत ठेवाआज पाच डिसेंबर. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘अन्न व...
‘आत्मनिर्भर’ : एक उलटा प्रवासनाणेनिधीच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या इकॉनॉमिक...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
ज्वारी, हरभरा, गहू बियाण्यांचा ‘...शिवणी (जि. जळगाव) येथील पद्मालय शेतकरी उत्पादक...
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...