agriculture news in Marathi pulses sowing increased by 10 lac heacter in state Maharashtra | Agrowon

राज्यात कडधान्याचे क्षेत्र दहा लाख हेक्टरने वाढले

सुर्यकांत नेटके
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

कडधान्य लागवड क्षेत्रावर दुष्काळाचा आणि बदलत्या वातावरणाचा परिणाम होताना दिसत आहे. यंदा मात्र क्षेत्र वाढले आहे. कडधान्याची मागणी पाहता विद्यापीठाने क्षेत्र आणि उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. मराठवाडा, विदर्भातील कोरडवाहू भागासाठी नवे वाण देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.
- डॉ. एन. एस. कुटे, कडधान्य सुधार प्रकल्पप्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

नगर ः मागील दोन वर्षात राज्यात पडलेल्या दुष्काळाचा कडधान्य उत्पादनावर परिणाम झाला आणि क्षेत्रात घट झाली. मात्र, आता पुन्हा राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून कडधान्याचे क्षेत्र आणि उत्पादनवाढासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा कडधान्याचे साधारण दहा लाख हेक्टर क्षेत्र वाढले आहे. तर, हरभऱ्याचे क्षेत्र सात लाख हेक्टरने वाढले. 

राहुरी कृषी विद्यापीठाने आतापर्यंत कडधान्याचे २९ वाण प्रसारित केले असून त्यात हरभऱ्याचे १३ वाण आहेत. यंदा खास कोरडवाहू क्षेत्रासाठी आणि बदलत्या हवामानावर मात करणाऱ्या हरभऱ्याचे साधारण पाच वाण प्रसारित करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले. 

राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडधान्याचे क्षेत्र मोठे असते. गेल्या पाच वर्षांत मात्र सततच्या दुष्काळाचा कडधान्य क्षेत्रावर परिणाम झाला. नेहमीच्या तुलनेत या दोन वर्षांत पंधरा ते सतरा लाख हेक्टर क्षेत्रावर घट झाली. यंदा मात्र पाऊस चांगला झाल्याने पुन्हा कडधान्याच्या क्षेत्रात राज्यात चांगली वाढ झाली आहे. हरभऱ्याचे राज्यात सरासरी १६ ते १७ लाख हेक्टर क्षेत्र असते. यंदा सुमारे तेवीस लाख हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी केली आहे.

तुरीचे राज्यात साधारण १० ते १२ लाख हेक्टर क्षेत्र असते. यंदा ते चौदा लाखापर्यंत गेले आहे. याशिवाय मूग, उडीद, मटकी, चवळी, कुथली, घेवड्याचे मिळून साधारण पाच लाख क्षेत्र असते. ते यंदा सात लाखाच्या जवळपास आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हरभऱ्याचे आतापर्यंत १३ वाण विकसित केले आहेत. त्यात १९९३ ला विजय, २००६ साली दिग्विजय व २०१६ साली फुले विक्रम वाणाचा समावेश आहे. या वाणांमुळे उत्पादनवाढीला मदत होत आहे.

२०१७ साली विकसित केलेल्या विक्रांत वाणाला यंदा पाच राज्यात विक्रीला परवानगी मिळाली. हर्वेस्टरने काढण्यात येणारा राज्यातील पहिला व देशातील पाचवा वाण असून या वाणामुळे उत्पादन वाढ तर होतेच, पण खर्चातही बचत होत असल्याचे सांगण्यात आले. तुरीचे तीन, मूग, मटकीचे प्रत्येकी २, चवळीचे ४, कुलथीचे ३, घेवड्याचे तीन असे कडधान्याचे २९ वाण आतापर्यत प्रसारित केले आहेत. 

यंदा हेक्टरी उत्पादकता १२०० किलोवर
२०१७-१८ वर्षात राज्यात कडधान्याचे क्षेत्र ४३ लाख ५२ हजार हेक्टर होते. त्यावर्षी ४५ लाख ८४ हजार टन उत्पादन झाले आणि उत्पादकता प्रति हेक्टरी ७५९ किलो होती. गेल्या वर्षी (२०१९-१९) दुष्काळाचा पारिणाम होऊन ३५ लाख ८ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली आणि २० लाख ७५ हजार टन उत्पादन व हेक्टरी उत्पादकता ५९१ किलो आली. यंदा उत्पादकता हेक्टरी १२०० किलोवर जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


इतर अॅग्रो विशेष
स्पेनच्या राजकन्येचा कोरोनामुळे मृत्यू...माद्रीद : स्पेनच्या राजकन्या मारीया टेरेसा यांचा...
राज्यात १२ नवे कोरोना रुग्ण, बाधितांची...मुंबई: राज्यात १२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र...पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या...
देशातील वस्त्रोद्योगाला दोन लाख कोटींचा...जळगाव ः देशात शेतीनंतर रोजगाराचा व आर्थिक...
राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या १८१;...मुंबई : राज्यात शनिवारी (ता.२९) आणखी २८ कोरोना...
फळे, भाजीपाला पुरवठ्यासाठी राज्यभर...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना फळे व...
नगर जिल्हा बॅंकेने दिले कर्जवसुलीचे...नगर ः कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी...
नगर, पुणे, सोलापूरात हजारवर वाहतूक...पुणे ः शहरांमध्ये भाजीपाला, फळे, दुध अशा...
राज्यात पुर्वमोसमी पावसाचा आजही अंदाज पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुर्वमोसमी...
वसंतदादा कारखान्याकडून सॅनिटायझरची...सांगली  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
जागतिक अर्थव्यवस्था भीषण मंदीच्या...वॉशिंग्टनः कोरोना महामारीमुळे जागतिक...
साखर उद्योगासमोर कच्च्या मालाची समस्या पुणे: देशातील साखर कारखान्यांकडे कच्चा माल नेणारी...
सॅनिटायझर्ससाठी ४५ साखर कारखाने,...कोल्हापूर: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
भाजीपाला विक्रीसाठी पुणे जिल्ह्यात...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शहरातील...
राज्यात १४७ कोरोनाबाधित रुग्ण मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढत...
मासे, मत्स्यबीज, मत्स्यखाद्याच्या...मुंबई : केंद्र सरकारच्या मत्स्यपालन विभागाने मासे...