agriculture news in marathi, pumpkin plantation become in trouble due to drought, buldhana, maharashtra | Agrowon

बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा कोहळा लागवडीला फटका
टीम अॅग्रोवन
रविवार, 21 जुलै 2019

यावर्षी ८ मे रोजी १२ एकरांत कोहळ्याची लागवड केली होती. अति तापमानामुळे वेलींवर करप्याचा प्रादुर्भाव झाल्याने त्यापैकी आठ एकरांतील वेल वाळून गेले. हे वेल काढून टाकावे लागले. आता चार एकरांत वेल आहेत. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांकडील पाणी आटल्याने त्यांनी लागवडच केली नाही. आम्ही जेमतेम चार एकरांतील पीक वाचवू शकलो. दरवर्षीच्या तुलनेत यंदा कोहळ्याची खूपच कमी लागवड झालेली आहे.  
- दादाराव चंद्रभान मापारी, खैरा, जि. बुलडाणा

नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात दरवर्षी हमखास उत्पादन मिळवून देणाऱ्या कोहळ्याची (गंगाफळ) लागवड मोठ्या क्षेत्रावर केली जात होती. ऐन जुलै-ऑगस्ट महिन्यात ही फळे काढणी येऊन शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे नगदी मिळण्याची संधी उपलब्ध व्हायची. यावर्षी मात्र दुष्काळी परिस्थितीचा फटका कोहळा लागवडीला बसला आहे. दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केही लागवड या तालुक्यात झालेली दिसून येत नाही.

दरवर्षी नांदुरा तालुक्यात नांदुरा ते मोताळा, नांदुरा ते जळगाव जामोद या दोन मार्गांना लागून असलेल्या विविध गावांमध्ये कोहळा लागवड प्रामुख्याने केली जायची. जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्यात कोहळ्याची फळे तोडणीचा हंगामही सुरू व्हायचा. यावर्षी इतर पिकांप्रमाणेच कोहळ्याचीही लागवड मोठ्या प्रमाणात घटली. पाणी नसल्याने तसेच मे महिन्यात सातत्याने तापमान वाढते राहिल्यामुळे शेतकऱ्यांनी ही लागवड करण्याचे धाडस केलेले नाही.

गेल्या काही वर्षांत या हंगामी पिकाने नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद तालुक्यांतील काही गावांत चांगला जम बसविला होता. सरासरी भाव मिळाले तरी शेतकऱ्यांना या पिकाने अनेकदा तारले. मे महिन्यात लागवड करून शेतकरी जुलै, ऑगस्ट महिन्यांत फळे तोडून या वेलवर्गीय पिकापासून चांगला पैसा मिळवत होते.

यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीने सर्वच पिकांना तडाखा दिला. पाणी कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांकडील विहिरी आटल्या. सिंचन बंद झाले. सोबतच संपूर्ण उन्हाळ्यात तापमान हे वाढलेले राहिले. याचा सारासार परिणाम कोहळ्याच्या लागवडीवरही झाला. 

दरवर्षी ४०० ते ५०० हेक्टरपर्यंत असणारी ही लागवड या वेळी १०० हेक्टरच्या आत असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. यावर्षी या फळाला चांगली मागणी आहे. बाजारपेठेत इतर भाजीपाला चांगले दर मिळवत असताना हे फळसुद्धा ग्राहकांना २५ ते ४० रुपयांदरम्यान प्रतिकिलोने विकत घ्यावे लागत आहे. येत्या काळात मागणी वाढल्यास आणखी दर सुधारण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही.
 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...