agriculture news in marathi Punchnama of crops completed in Sangli district | Page 2 ||| Agrowon

सांगली जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे पूर्ण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

सांगली : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ४१ हजार ३६२ शेतकऱ्यांचे ३४ हजार १९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

सांगली : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ४१ हजार ३६२ शेतकऱ्यांचे ३४ हजार १९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. तासगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. आता शेतकरी मदतीची प्रतीक्षा करू लागला आहे.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने थैमान घातले होते. खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. दुष्काळी पट्ट्यात देखील पावसाने फळ पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे करण्यास सुरवात केली. पंधरा ते वीस दिवसांत बाधित पिकांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. कृषी विभागाने शेतीचे केलेले पंचनाम्यांचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात आला आहे.  

पूर्वीच्या नुकसान भरपाईच्या निकषानुसार ४१ हजार ३६२ शेतकऱ्यांना ३८ कोटी ३० लाख २१ हजार रुपयांची मदत मिळणार होती.  

दरम्यान, शासनाने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची मदत दिवाळीच्या अगोदर देण्याचे जाहीर केले आहे. अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे ३३ टक्के नुकसान झाले आहे, जिराईत व बागायती पिकांच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी १० हजार, तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार अशी मदत जाहीर केली.

२६ कोटी १० लाख मंजूर

जिल्ह्यात जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेती, पिकांसाठी, अतिवृष्टी व पुरामुळे मृत्यू झालेल्या जनावरांसाठी, नुकसान झालेल्यांसाठी मदतीसाठी राज्य शासनाकडून सुमारे २६ कोटी १० लाख ६८ हजार रुपये मंजूर झाले आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवडजळगाव ः  खानदेशात कापूस प्रमुख पीक आहे. यंदा...
भीमा-नीरा नदी काठांवरील गावांनी सतर्क...सोलापूर : ‘‘भीमा-नीरा खोऱ्यात होत असलेल्या...
मराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमीऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. २३)...
नाशिक जिल्ह्यात खासगी पशुसेवकांचे काम...येवला : खासगी पशुसेवक ग्रामीण भागात मोठ्या...
मुगावर ‘लिफ क्रिंकल’ प्रादुर्भावअकोला : गेल्या हंगामात लिफ क्रिंकल विषाणूजन्य...
परभणी जिल्ह्यात मोठ्या, मध्यम...परभणी ः पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला....
लिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ...सद्यःस्थितीत आंबिया बहराची फळे ही विकसनशील...
नीरा देवघर धरणक्षेत्रात सर्वाधिक २५५...पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम पट्यात...
‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर...पुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक...
विमा लाभापासून शेतकऱ्यांना वंचित...नगर : नैसर्गिक आपत्ती, अन्य कारणाने नुकसान होऊनही...
साताऱ्यात पावसाचा जोर कमी झालासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट...
केळी उत्पादकांना वादळ नुकसानभरपाईची...अकोला : जिल्ह्यात अकोट तालुक्यात १५ मे २०२० रोजी...
अतिवृष्टिग्रस्तांना अन्नधान्य,...नाशिक : आपत्तीग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदत म्हणून...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून, उत्तर...
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरलाऔरंगाबाद : मराठवाड्यात गुरूवारच्या (ता.२२) तुलनेत...
औरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी,...औरंगाबाद : जिल्ह्यात आधारभूत दराने खरेदी केंद्र...
नांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखालीनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या...
खानदेशात कांद्याच्या रोपवाटिका...जळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे...
अतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणकाहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै...
चिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून...रत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड,...