खानदेशात गारपिटीतील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरूच

जळगाव ः खानदेशात सलग तीन दिवस अनेक भागात गारपीट व वादळी पाऊस झाला आहे. यामुळे रब्बी पिकांची मोठी हानी झाली. पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्याचा अहवाल शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी प्रशासनाला प्राप्त होण्याचे संकेत आहेत.
Punchnama of hail-damaged crops continues in Khandesh
Punchnama of hail-damaged crops continues in Khandesh

जळगाव  ः  खानदेशात सलग तीन दिवस अनेक भागात गारपीट व वादळी पाऊस झाला आहे. यामुळे रब्बी पिकांची मोठी हानी झाली. पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्याचा अहवाल शुक्रवारी (ता.२६) सायंकाळी प्रशासनाला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

शनिवारी (ता.२०) व रविवारी (ता.२१) व सोमवारी (ता.२२) धुळे, जळगाव व नंदुरबारातील काही भागात गारपीट, वादळी पाऊस झाला. मंगळवारीदेखील  (ता.२३) अनेक भागात वादळी पाऊस झाला. मंगळवारी गारपीट फक्त साक्री, धुळे पश्चिम भागात झाली. यात सुमारे ५० हजार हेक्टरवरील कांदा, मका, गहू, ज्वारी, बाजरी, केळी आदी पिकांचे नुकसान झाले. सुमारे ३०० कोटींचा फटका बसला. 

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, जळगावचा पूर्व भाग, अमळनेर, पारोळा, धुळ्यात साक्री, धुळे, नंदुरबारमध्ये नंदुरबार, नवापूर आदी भागात गारपीट व वादळी पाऊस झाला आहे. सुमारे २० ते २२ मिनिटे सुसाट वारा होता. यात पिके आडवी झाली. तर गारपिटीत कांदा, मका, केळी पिकाला फटका बसला. कलिंगडाचेही काही भागात नुकसान झाले. केळी पिकाचे पाचोरा, भडगाव भागात नुकसान झाले. 

अहवाल राज्य शासनाला सादर होणार

पंचनामे सुरू झाले आहेत. बुधवारी (ता.२४) पंचनाम्याची कार्यवाही अनेक भागात पूर्ण झाली. तर मोठे भौगोलिक क्षेत्र असलेल्या भागातील पंचनामे गुरुवारी (ता.२५) पूर्ण झाले. शुक्रवारी अहवाल अपेक्षित आहे. हा अहवाल प्रशासनाला सादर केला जाईल. प्रशासन माहिती तपासून राज्य शासनाला अहवाल सादर करील, अशी माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com