गारपीटग्रस्तांचे पंचनामे करा ः ऊर्जामंत्री राऊत

शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
Punchnama of hail victims: Energy Minister Raut
Punchnama of hail victims: Energy Minister Raut

नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची, गहू, हरभरा, धान व ज्वारी या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पिकांचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

कुही तालुक्यातील वडेगाव या नुकसानग्रस्त गावाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. आमदार राजू पारवे, जिल्हा परिषद सदस्य मनीषा फेंडर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार बी. एन. तिनघसे, तालुका कृषी अधिकारी प्रदीप पोटदुखे, महावितरण उमरेडचे कार्यकारी अभियंता दिलीप घाटोड, उपकार्यकारी अभियंता भुपेश रंधये आदी उपस्थित होते.

२०१३, २०१४ तसेच आता २०२१ मध्ये पुन्हा निसर्गाने धोका दिला. त्यामुळे हाती आलेले मिरची, हरभरा व धान पीक गेले, असे वडगाव येथील शेतकरी श्री. लुटे यांनी राऊत यांच्याशी संवाद साधताना सांगितले. कुही तालुक्यातील वडेगाव, पचखेडी, परसोडी, नवेगाव, मदनापूर, माजरी, मांढळ, भांडारबोडी, सोनगाव, रेंगातूर व बोरीसदाचार या नुकसानग्रस्त गावांचा समावेश आहे. या गावांतील ७०१ शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे. पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील एकूण क्षेत्राच्या ३३ टक्के म्हणजेच ३०४.११ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

कुही तालुक्यात ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्याने बाधित २२ हजार सात शेतकऱ्यांना १९ कोटी ७७ लाख १४ हजार ६३६ रुपयांचे बँकेमार्फत अनुदान वितरित करण्यात आल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. श्री. राऊत यांच्या हस्ते कुही पंचायत समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात व्हीलचेअर, ट्रायसिकल वितरण करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com