Agriculture news in marathi Punchnama immediately after the water receded | Page 2 ||| Agrowon

पाणी ओसरताच तातडीने पंचनामे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 जुलै 2021

पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे.

कोल्हापूर : पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत या भागातील मंत्र्यांसह मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करणार आहे. पुराचे संकट ओढवलेल्या नागरिकांना उभे करण्याचे काम राज्य शासन करेल, पाणी ओसरेल तसे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

जिल्ह्यातील पूर परिस्थितीबाबत येथील राजर्षी शाहू सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन मंडळाचे  कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, आदींसह अधिकारी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘शिरोली व किणीजवळ पुराचे पाणी आल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग बंद झाला. महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे दूध, इंधन, अन्नधान्याची वाहतूकही ठप्प झाली. भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. २००५, २०१९ व २०२१ मधील पुराच्या पाण्याच्या पातळीचा विचार करून महामार्गाची उंची वाढवण्याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली जाईल. तर राज्य मार्ग व अंतर्गत मार्गांची कामे राज्य शासनासह वर्ल्ड बँक व अन्य बँकांच्या सहकार्यातून केली जातील.

दर वर्षी पुराच्या पाण्यामुळे वाहत येणारी माती, राडारोडा साचून नदीपात्रात गाळ साचला असल्यास नदीचा गाळ काढून नदीचा प्रवाह सुरळीत ठेवता येईल का? याचा अभ्यास करून उपाययोजना सूचविण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त प्रधान सचिव एकनाथ पाटील यांची समिती स्थापन करण्यात येईल.’’


इतर बातम्या
एकरूख सिंचन योजनेसाठी ५० कोटी रुपये...सोलापूर ः ‘‘अक्कलकोट, दक्षिण सोलापूरसाठी...
‘नांदगावात अतिवृष्टीनं सारं नेलं’नाशिक : नांदगाव तालुका अवर्षणप्रवण असल्याने इथली...
नाशिक जिल्ह्यात नऊ केंद्रावर मका,...येवला : हमीभावाने मका,ज्वारी, बाजरी खरेदीसाठी...
प्रशासक मंडळ हटविल्यास दूध संकलन बंद...सोलापूर ः सोलापूर जिल्हा दूध संघाचे विद्यमान...
‘मामा’ तलाव रुतले गाळात साकोली, जि. भंडारा : भंडारा, गोंदिया जिल्ह्यांतील...
राज्यात उद्यापासून पावसाची उघडीप शक्यपुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस उद्यापासून (ता....
कीडनाशके साठ्यांच्या होणार संगणकीय नोंदीपुणे ः देशातील कीडनाशके विक्री करणाऱ्या दुकानात...
ई-पीक पाहणी ॲपमध्ये आंतरपीक नोंदणीला ‘...पथ्रोट, जि. अमरावती : शासनाच्या ई-पीक पाहणी...
मानवाधिकार आयोगाची शेतकरी आंदोलनावरून...नवी दिल्ली ः राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (...
ई-पीक पाहणीबाबत काही भागांतून तक्रारीपुणे ः आपल्या शेतातील पिकाची नोंद स्वतः...
पालघर, नाशिकमध्ये मुसळधारपुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक...
काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून...सिंधुदुर्गनगरी : आंबा, काजू बागायतदारांना...
कोयना धरण क्षेत्रात  पावसाचा जोर कायम सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा...
परभणीत ‘रोहयो’तून ८८.१५ हेक्टरवर फळबाग...परभणी ः ‘‘जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय...
परभणी जिल्ह्यात सोयाबीन, कपाशी, तुरीचे...परभणी ः जिल्ह्यात यंदा मंगळवार (ता.१४) पर्यंत ९००...
रत्नागिरीत पावसाचा जोर कायम रत्नागिरी : ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर कायम आहे....
सांगलीत पशुधनाचे लसीकरण रखडले सांगली : जिल्ह्यात पशुधनाची संख्या ११ लाख ०३ हजार...
जळगाव जिल्ह्यात दीड लाख शेतकरीच पीकविमा...जळगाव ः दर वर्षी ऑगस्ट, सप्टेंबरअखेर शेतकरी...
पशुधनाच्या आरोग्यविषयक  सुविधा तत्काळ...नागपूर : पशू वैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे...
वीजबील थकबाकीची वसुली  न झाल्यास राज्य...मुंबई : ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी वीजबिलाची...