agriculture news in marathi Pune administration declares emails for travel and stay permission in lockdown | Agrowon

पुण्यातून मूळगावी जाण्यासाठी माहिती पाठवा : प्रशासनाचे आवाहन

वृत्तसेवा
शुक्रवार, 1 मे 2020

पुणे शहर, उपनगरांत अडकून पडलेले किंवा मूळगावी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी परवागीकरिता इ-मेलच्या माध्यमातून माहिती पाठविण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

पुणे : पुणे शहर, उपनगरांत अडकून पडलेले किंवा मूळगावी जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी परवागीकरिता इ-मेलच्या माध्यमातून माहिती पाठविण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. याकरिता क्षेत्रनिहाय इ-मेल आयडी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

पुणे शहर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील एरंडवणा, येरवडा, औंध, बोपोडी (खडकी), पर्वती (सहकारनगर, मुंकुदनगर), दत्तवाडी, वानवडी, घोरपडी पेठ, कोरेगाव पार्क, मुंढवा, केशव नगर, शिवाजीनगर, गोखले नगर, वडारवाडी, बिबवेवाडी (मार्केटयार्ड, गुलटेकडी) पुणे शहर व सर्व पेठा. या भागातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे. त्यांनी त्यांची माहिती पाठविण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 

याकरिता tahasildarpunecity@gmail.com या इ-मेल वर पाठवावी. तसेच हवेली कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील  बाणेर, कोंढवा, धनकवडी, बालाजी नगर, सिंहगड रोड, धायरी, विश्रांतवाडी चंदननगर, हडपसर, मांजरी, कोथरूड, बालेवाडी, इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती tahasildarhavelipune@gmail.com या इ-मेल वर पाठवावी लागणार आहे. 

मुळशी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामधील पाषाण, सुस, वाकड हिंजवडी, बावधन इत्यादी भागातील नागरिकांनी त्यांची माहिती tahasildarmulshi@gmail.com या इ-मेल वर पाठवावी. या सर्व ठिकाणी माहिती पाठविताना संपूर्ण नाव , सध्याचा पत्ता, मोबाईल नंबर व्यवसाय –विद्यार्थी/ कामगार/नोकरी/अन्य- त्याचा पत्ता, मूळ गावचा पत्ता- गाव, तालुका, जिल्हा, राज्य, प्रवास कसा करणार आहात- स्वत:चे वाहन/सार्वजनिक वाहन, किती लोक प्रवास करणार याबाबतची माहिती देणे आवश्यक आहे. असे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...