agriculture news in marathi, pune agriculture college agri tech fest 2017 | Agrowon

पुणे कृषी महाविद्यालय 'कृषी तंत्रज्ञान महोत्सव'

रविवार, 10 सप्टेंबर 2017

गोवंश, शेळी, मेंढी प्रदर्शन आणि तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया तसेच नगदी पिके

गोवंश, शेळी, मेंढी प्रदर्शन आणि तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया तसेच नगदी पिके

पुणे : बदलत्या हवामानात शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न कसे वाढवावे या उद्देशाने पुणे कृषी महाविद्यालयाच्या वतीने आज (ता.१०) पासून कृषी तंत्रज्ञान महोत्सवास प्रारंभ झाला. महोत्सव रविवार ते बुधवार (ता. १३ सप्टेंबर २०१७) या कालावधीत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवादरम्यान राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विविधांगी कृषीविषयक संशोधने एकाच ठिकाणी पाहण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

महोत्सवात काय पहाल..
महाविद्यालयाच्या ११० एकर क्षेत्रावर तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया तसेच नगदी पिके यामधील विविध २८ पिकांचे ७४ वाण, वीस भाजीपाला पिकांचे ३९ वाण, बारा फुलपिकांचे ४६ वाण, फळपिकांचे २४ वाणांची पीक प्रात्यक्षिके पाहण्यास मिळणार आहे. याशिवाय भारतीय गोवंशाच्या नऊ जाती शेतकऱ्यांना पाहता येणार आहे. कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे.