पुणे बाजार समितीच्या प्रशासकांच्या मुदतवाढीवर आज निर्णय ?

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या मुदतवाढीबाबत आज (ता.२१) निर्णय होण्याची शक्यता व्यक्त आहे.
पुणे बाजार समितीच्या प्रशासकांच्या मुदतवाढीवर आज निर्णय ?
पुणे बाजार समितीच्या प्रशासकांच्या मुदतवाढीवर आज निर्णय ?

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या मुदतवाढीबाबत आज (ता.२१) निर्णय होण्याची शक्यता व्यक्त आहे. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार आणि पणन विभागातील उच्चाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे.

बाजार समितीच्या प्रशासक आणि सचिवपदी देशमुख यांनी प्रशासकीय काळात सर्वाधिक काळ काम केले. याकाळात बाजार समितीचे आर्थिक उत्पन्न मोठ्याप्रमाणावर वाढवीत २०० कोटी रुपयांपर्यंत ठेवी केल्या आहेत. तर न्यायालयीन खटल्यांमध्ये अडकलेल्या विविध जागा देखील बाजार समितीच्या ताब्यात घेत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बाजार समितीच्या नावावर केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. 

दरम्यान, प्रशासकीय राजवटीमध्ये मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश घुले आणि प्रकाश म्हस्के यांनी करत, देशमुख यांची हकालपट्टीसह चौकशी करण्याची मागणी पणन मंत्र्यांकडे केली आहे. या मागणीसाठी म्हस्के-घुले यांनी पालकमंत्री पवार यांच्याकडे साकडे घातले होते. मात्र हा विषय माझा नसल्याचे  सांगत पणन मंत्र्यांकडे जाण्याचे सांगितल्याचे समजते. 

दरम्यान, म्हस्के-घुले यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचा लेखी सविस्तर खुलासा देशमुख यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन केला आहे. देशमुख यांची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत आहे. पालकमंत्री पवार यांनी आज दुपारी (ता.२१) पणन विभागातील विषयांवर बैठक बोलविली आहे. यात पणन संचालक सतीश सोनी, अपर आयुक्त (प्रशासन) यांना बोलावले आहे. यात देशमुख यांच्या मुदतवाढीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान पूना मर्चंटस चेंबर ने देखील देशमुख यांच्या मुदतवाढीसाठी पालकमंत्री पवार यांना पत्र दिले आहे. पत्र घेऊन अध्यक्ष पोपटशेठ ओस्तवाल, वालचंद संचेती, राजेश शहा यांनी पालकमंत्री पवार यांची भेट घेतली आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com