पुण्यात डाळिंबा पाठोपाठ फळे-भाजीपाला अडत्यांना वसुलीची नोटीस 

पुणे : फळे-भाजीपाला अडत्यांकडून ४ कोटी ३८ लाखांच्या वसुलीची नोटीस 
पुणे : फळे-भाजीपाला अडत्यांकडून ४ कोटी ३८ लाखांच्या वसुलीची नोटीस 

पुणे : येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब अडत्यांनी शेतकऱ्यांच्या हिशोब पट्टीतून ३० कोटी ५५ लाखांची बेकायदा वसूल केल्याची घटना समोर आल्यानंतर, आता फळे भाजीपाला विभागातील १८ अडत्यांकडून ४ कोटी ३८ लाख रुपये बेकायदा वसुली प्रकरणी बाजार समितीने नोटिसा बजावल्या आहेत. यामधील चार अडत्यांकडून २७ लाख २७ हजार ४६० रुपये भरण्याची अंतिम आदेश बजावण्यात आली आहे. प्रशासक बी.जे.देशमुख यांनी शनिवारी (ता.७) पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०१८ दरम्यानच्या कालावधी मधील दफ्तर तपासणी करण्यात आली होती. श्री. देशमुख म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या हिशोब पट्टीमधून हमाली, तोलाई, बाजारशुल्क  नियमापेक्षा अधिक वसुली प्रकरणी ७२ अडत्यांची दफ्तर तपासणी सुरू आहे. यामध्ये उपलब्ध व्यापार आणि प्रत्यक्षात झालेला व्यापार, प्रत्येक हिशोबपट्टी, बॅंक खाते यांची तपासणी सनदी लेखापालांकडून करण्यात आली. यामध्ये ३२ अडत्यांची तपासणी पूर्ण झाली असून,यामध्ये डाळिंब विभागातील ४ अडत्यांना ३० कोटी ५५ लाखांच्या नियमबाह्य वसुलीच्या नोटिसा यापूर्वीचं बजावण्यात आल्या आहेत. उर्वरित २७ अडत्यांपैकी १४ अडत्यांना निष्पन्न झालेल्या येणे बाकीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर उर्वरित १२ अडत्यांची दफ्तर तपासणी सुरू असून, एक अडत्यांकडे कोणतीही वसुली निघाली नाही.‘‘    कारवाई विषयी माहिती देतांना प्रशासक बी.जे. देशमुख पहा video  

चार अडत्यांना २७ लाख २७ हजार ४६० रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यांपैकी ४ लाख ९८ हजार ६२० रुपये भरण्यात आले आहेत. तर उर्वरित १४ अडत्यांना ४ कोटी २६ लाख ६२ हजार ४६८ रुपये भरण्याबाबतच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. यांनी या रकमेबाबत १५ दिवसांत खुलासा करण्याचे सांगण्यात आले आहेत. त्यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. अंतिम आदेश देण्यात आलेले अडते 

अडतदार रक्कम 
पंडित पर्वतराव पवार (गाळा क्र. ६३६ ) ३ लाख ७ हजार ३८७ 
मे.कोरपे आणि कंपनी (गाळा क्र. २८७,२८९,२९०) ४१५
मे. शिवशंकर ट्रेडर्स (गाळा क्रमांक २८८, ४४१, ४४२) ६ हजार ३४३ 
मे.जवळकर आणि कंपनी (गाळा क्र. ७६३) २४ लाख १३ हजार ३०५ 

नोटीस बजावण्यात आलेले अडते 

अडतदार गाळा क्रमांक वसूल पात्र रक्कम
सुभाष पंढरीनाथ दुंडे ६१३ ५४ लाख ३० हजार ३३७ 
जोशी आवटे कंपनी ४० १५ लाख ७४ हजार ६६२ 
मे. माउली ट्रेडींग कंपनी १३५ ११ लाख ९४ हजार ९५ 
मिलिंद लेमन कंपनी ६७ ५८ लाख ६९ हजार ९६२ 
अतुल दत्तात्रय जाधव ६५६ ५३ लाख ११ हजार ९४५ 
मे. साईबा ट्रेडिंग कंपनी ७३८ ७ लाख ९६ हजार १४७
पी.एम.दरेकर ८०६ ५० लाख ६७ हजार ८४७ 
किशोर ट्रेडींग कंपनी ७०२ २३ लाख ३४ हजार ८२७ 
बेल्हेश्‍वर ट्रेडर्स ६४६ २७ लाख ९९ हजार १०२ 
एकनाथ रामचंद्र खिरीड ५८६ ६ लाख ६ हजार ९२५ 
गुरुदेवदत्त एजन्सी ४६७ १ कोटी १५ लाख ५ हजार ३८५ 
अंचलेश्‍वर ट्रेडर्स ८४९ ११ हजार ५५५ 
नामदेव विष्णू म्हेत्रे १७४ १ लाख ३ हजार २१७ 
मे दत्तकृपा फ्लॉवर   ५६ हजार ८६२ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com