पुणे बाजार समिती आजपासून बंद

पुणे: शहरातील कोरोना विषाणू बाधित आणि मृत्यूचे वाढते प्रमाणामुळे दाट लोकवस्ती असलेले भाग सील केल्यानंतर, बाजार समिती लगत असलेल्‍या झोपडपट्टीमधील नागरिकांचा धोका टाळण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार थांबविण्याचा आणि समिती १० एप्रिल (आज) पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पुणे बाजार समिती आजपासून बंद
पुणे बाजार समिती आजपासून बंद

पुणे : शहरातील कोरोना विषाणू बाधित आणि मृत्यूचे वाढते प्रमाणामुळे दाट लोकवस्ती असलेले भाग सील केल्यानंतर, बाजार समिती लगत असलेल्‍या झोपडपट्टीमधील नागरिकांचा धोका टाळण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार थांबविण्याचा आणि समिती १० एप्रिल (आज) पासून पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  कोरोना लॉकडाऊन मध्ये शेतमालाला उठाव मिळण्याबरोबरच ग्राहकांना फळे भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी विविध उपाययोजना आणि खबरदारी घेत सुरू असलेली पुणे बाजार समिती गेल्या १५ दिवसांपासून सुरळीत सुरू होती. मात्र शहरातील रुग्णांची वाढती संख्या, बाजार समितीलगत असलेल्या दाट लोकवस्तीमधील बाधितांची संख्या वाढत असताना, कामगार आणि अडते असोसिएशनने बाजारातील धोका ओळखून समिती बंद ठेवण्याची विनंती प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार उद्यापासून (ता.१०) अखेर पुढील आदेश येई पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक बाजार समितीने जारी केले आहे. दरम्यान, गुरुवारी (ता.९) मुख्य आवारात २५७ वाहनांमधून ५ हजार क्विंटल तर मोशी उपबाजारात १६० वाहनांमधून ३ हजार ६०० असा एकूण ४१७ वाहनांमधून ८ हजार ६०० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com