agriculture news in marathi Pune APMC to remain open on Monday | Agrowon

पुणे बाजार समिती सोमवारी सुरू; शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध राहणार : प्रशासक

टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 मार्च 2020

पुणे (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन दिवस बंद असलेली बाजार समिती सोमवारी (ता. २३) सुरळीत सुरू राहणार असून, गर्दी टाळण्यासाठी विविध उपयायोजना करण्यात आल्याची माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. याबाबत देशमुख यांनी बाजार आवारातील सर्व संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता. २१) घेतली.

पुणे (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर गेली दोन दिवस बंद असलेली बाजार समिती सोमवारी (ता. २३) सुरळीत सुरू राहणार असून, गर्दी टाळण्यासाठी विविध उपयायोजना करण्यात आल्याची माहिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. याबाबत देशमुख यांनी बाजार आवारातील सर्व संघटना पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी (ता. २१) घेतली.

दरम्यान, शहरात सर्वत्र भाजीपाला उपलब्ध होण्यसाठी बाजार समिती प्रशासन आणि बाजार घटक प्रयत्नशील असून, बाजार समितीमधील गर्दी टाळण्यासाठी किरकोळ आणि घरगुती खरेदीदारांनी सोमवारी (ता. २३) बाजार समितीमध्ये फळे भाजीपाला खरेदीसाठी येऊ नये, असे आवाहनदेखील देशमुख यांनी केले आहे.

याबाबत बोलताना देशमुख म्हणाले, ‘‘गेल्या तीन दिवसांपासून शहरात भाजीपाल्याची टंचाई जाणवू लागल्याने, शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध करण्याच्या उपाययोजना सर्व बाजार घटक करत आहे. यासाठी सोमवारी (ता.२३) पहाटे ३ ते सकाळी ८ वाजेपर्यंत भाजीपाला विभाग, ८ ते १० फळे आणि १० ते १२ वाजेपर्यंत कांदा बटाटा विभाग सुरू ठेवण्यात येणार आहे, तर किरकोळ बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान बाजार आवारात घरगुती ग्राहक आणि किरकोळ ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी त्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. किरकोळ व्यापाऱ्यांद्वारे शहरात आणि उपनगरांमध्ये मुबलक भाजीपाला उपलब्ध करण्यासाठी त्यांना खरेदीसाठी प्रवेश देण्यात येणार आहे.’’ 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...