agriculture news in Marathi Pune APMC started properly Maharashtra | Agrowon

पुणे बाजार समितीत आज केवळ फळे, कांदा बटाटा व्यवहार

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 मार्च 2020

लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांमध्ये भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणावर झालेल्या गर्दीचे मुंबई, कोल्हापूर नियोजन कोलमडल्यानंतर पोलीस आणि पुणे बाजार समिती प्रशासनाने योग्य खबरदारी घेत बाजार सुरळीत सुरु केला.

पुणे: लॉकडाऊनमध्ये बाजार समित्यांमध्ये भाजीपाला खरेदीसाठी मोठ्याप्रमाणावर झालेल्या गर्दीचे मुंबई, कोल्हापूर नियोजन कोलमडल्यानंतर पोलीस आणि पुणे बाजार समिती प्रशासनाने योग्य खबरदारी घेत बाजार सुरळीत सुरु केला. अडते असोसिएशनचा बंद झुगारत प्रशासनाने ५१४ भाजीपाल्याची यशस्वी विक्री करत शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा दिला आहे. तर मोशी, मांजरी आणि खडकी येथील उपबाजारांसह सुमारे ८५९ भाजीपाल्याची विक्री करण्यात आली आहे. यामुळे शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध झाल्याने कृत्रिमरीत्या वाढविलेली दरवाढ नियंत्रणात आली आहे. 

गर्दीमुळे कोरोनाच्या संसर्गाच्‍या भीतीमुळे गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांनी ३१ मार्चपर्यंत बंद पुकारला आहे. हा बंद संघटनांनी मागे घेत, कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही यासाठीच्या विविध खबरदाऱ्या घेत बाजार सुरु ठेवण्यासाठी बाजार समिती प्रशासन आणि जिल्हा प्रशासन सातत्याने विनंती केली होती. आणीबाणीच्या परिस्थिती संघटना बंद वर ठाम होत्या.

यानंतर प्रशासनाने अडत्यांशिवाय बाजार समिती सुरु ठेवण्याची कठोर भूमिका घेत, आपत्ती निवारण कायद्यान्वये परवाने रद्द आणि गाळे ताब्यात घेण्याची कडक भूमिका घेतल्यानंतर काही अडते कामावर येण्यात तयार झाले. यानुसार रविवारी (ता.२९) गुलटेकडी येथील आवारात सुमारे ५१४ लहान मोठ्या वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती. 

हि आवक होत असताना पोलीस आणि बाजार समिती प्रशासनाने रविवारी (ता.२९) केवळ भाजीपाला विभागच सुरु ठेवण्याचे नियोजन केले होते. तर खरेदीसाठी केवळ अ वर्ग परवानाधारक खरेदीदारांना टप्प्याटप्प्याने मुख्य प्रवेशद्वार वगळता चार क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात आला. यामुळे बाजारातील गर्दी नियंत्रणात राहिली व सोशल डिस्टनिंगची देखील प्रभावी अंमलबजावणी झाली. 

याबाबतची माहिती देताना प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले, ‘‘मुंबई, कोल्हापूर बाजार समितीमधील नियोजन गर्दीमुळे कोलमडल्यामुळे पुणे बाजार समिती मधील नियोजन यशस्वी करुन दाखवायचे आमच्या पुढे आव्हान होते. हे आव्हान आम्ही पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या समन्वयातून सुमारे १५० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह यशस्वी करुन दाखविले. मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी होऊ नये म्हणून शिवनेरी रस्त्यासह प्रमुख रस्ते पहाटे चार नंतर बंद करण्यात आले.

सर्व खरेदीदारांची वाहने ४ क्रमांकाच्या प्रवेशद्वारातून सोडण्यात आली. यामुळे बाजार आवारातील अनावश्‍यक गर्दी नियंत्रणात राहिली व तातडीने भाजीपाला खरेदी करुन टेम्पो चालकांना बाहेर काढण्यात आले. गुलटेकडी मुख्य आवारासह मांजरी, मोशी आणि खडकी येथील उपबाजारात सुमारे ८५९ लहान मोठ्या वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाली होती.’’ 

‘‘रविवारी झालेल्या आवकेमुळे शहरात मुबलक भाजीपाला उपलब्ध झाला असून, कृत्रिम भाववाढ देखील कमी झाली आहे. आज (ता.३०) भाजीपाला विभाग बंद राहणार असून, फळे आणि कांदा बटाटा विभाग सुरु होऊन, आजच्या सारखेच नियोजन करुन, शहरात फळे, कांदा बटाटा मुबलक उपलब्ध होईल. त्यामुळे ग्राहकांनी चढ्या दराने भाजीपाला खरेदी करु नये,’’ असेही देशमुख म्हणाले. 

पुढारी अडते, कामगार नेते गायबच 
शेतकऱ्यांच्या जिवावर गलेलठ्ठ झालेले, आणीबाणीच्या परिस्थितीत शेतकरी, ग्राहक, बाजार समिती आणि प्रशासनाला गरज असताना, बाजार समिती बंदसाठी आग्रही असलेले आडते असोसिएशनचे पदाधिकारी नेते, कामगार नेते रविवारी देखील बाजार आवारात फिरकले नाहीत. काही मोजक्या अडत्यांनी आणि कामगारांनी उपस्थित राहून बाजार आवार सुरळीत ठेवला होता. 
 
 


इतर अॅग्रो विशेष
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...