पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र परवाने असलेल्यांनाच प्रवेश

पुणे: कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतमालाला बाजारपेठ मिळावी आणि शहरात मुबलक भाजीपाला पुरवठा व्हावा यासाठी रविवारी (ता.२९) पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाज सुरु असणार आहे.
पुणे बाजार समिती आजपासून सुरु;  मात्र परवाने असलेल्यांनाच प्रवेश
पुणे बाजार समिती आजपासून सुरु; मात्र परवाने असलेल्यांनाच प्रवेश

पुणे : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये शेतमालाला बाजारपेठ मिळावी आणि शहरात मुबलक भाजीपाला पुरवठा व्हावा यासाठी रविवारी (ता.२९) पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती कामकाज सुरु असणार आहे. मात्र, केवळ परवानाधारक व्यापाऱ्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिली. तसेच गर्दी नियोजनासाठी उद्या भाजीपाला आणि त्यानंतर फळे आणि कांदा बटाटा विभाग सुरु ठेवण्यात येणार आहेत. दिवसाआड हे नियोजन असेल.  दरम्यान, काही अडते समाजमाध्यमांवर बाजार बंद असल्याचे संदेश फैलावत आहेत. त्यांच्यावर आणि जे अडते गाळ्यावर येणार नाहीत त्यांच्‍यावर वैयक्तिक जबाबदारी निश्‍चित करुन, गाळे ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करणार असल्याचे प्रशासक देशमुख यांनी स्पष्ट केले.   बाजारसमितीतील नियोजनाबद्दल प्रशासक देशमुख काय म्हणाले... पहा व्हीडिओ

श्री. देशमुख म्हणाले,‘‘आणीबाणी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडते संघटनेने केलेली बाजार बंदची घोषणा बेकायदा आहे. बाजार समिती ही कायद्याने सुरु असून, अडत्यांना परवाने हे कायद्याने दिलेले आहेत. त्यामुळे कायद्याला बांधील राहून बाजार सुरु ठेवणे हे बंधनकारक आहे. बाजार आवारात होणारी गर्दी टाळण्यासाठी एक एक विभाग दिवसाआड सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये रविवारी (ता.२९) पालेभाज्या आणि फळभाज्यांची आवक होणार असून, सोमवारी (ता.३०) फळे आणि कांदा बटाटा विभाग सुरु असणार आहे. या दिवशी भाजीपाल्याची आवक होणार नाही, असे नियोजन आहे.’’

‘‘परवानाधारक खरेदीदार, कामगार आणि अडत्यांना देखील ओळखपत्रे दिली असून, रात्री ९ ते पहाटे चार शेतमालाच्या गाड्या खाली होणार असून, साडेचार वाजता हि वाहने बाजार आवारा बाहेर काढण्यात येणार आहेत. यानंतर साडेचार वाजता कामगार,अडते आणि खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासन आणि बाजार समिती प्रशासन घेणार आहे,’’ असे श्री. देशमुख यांनी स्पष्ट केलेे. 

दरम्यान बाजार समिती बंद असल्याची अफवा काही घटक करत आहेत यावर पोलीस प्रशासनाची करडी नजर असून, अशा अफवा पसरविण्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तर सर्व बाजार घटकांना हमाल, तोलणार आणि अडत्यांना कामावर येण्याची विनंती केली आहे. जे कोण कामावर न येता बाजार व्यवस्था वेठीस धरणार असतील त्यांच्यावर आपत्तीव्यवस्थापन कायद्या अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तर जे अडते कामावर येणार नाहीत त्यांचे गाळे ताब्यात घेऊन, त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असून, त्यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी निश्‍चित करुन गुन्हे दाखल केले जाणार आहेत. असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.  आज ६०० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक  शनिवारी बाजार समितीला साप्ताहिक सुट्टी असल्याने मुख्य आवारात भाजीपाल्याची आवक झाली नाही. मात्र मोशी, उत्तमनगर, खडकी या उपबाजारात लहान मोठ्या सुमारे ६०० वाहनांमधून भाजीपाल्याची आवक झाल्याचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com