पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग रविवारपासून सुरू

कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या वस्त्यांमध्ये वाढल्यानंतर गेली दोन महिने बंद असलेला फळ भाजीपाला विभाग रविवार (ता.३१) पासून सुरू होणार आहे.
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग रविवारपासून सुरू
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग रविवारपासून सुरू

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या वस्त्यांमध्ये वाढल्यानंतर गेली दोन महिने बंद असलेला फळ भाजीपाला विभाग रविवार (ता.३१) पासून सुरू होणार आहे. यासाठी प्रशासनाने नियमावली केली असून, चक्राकार पद्धतीने बाजार सुरू होणार आहे.     बाजार समितीमधील फळे भाजीपाला विभाग सुरू करण्याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्या होत्या. त्यानंतर पणन संचालक सुनील पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, प्रशासक बी. जे. देशमुख यांनी विविध बाजार घटकांसोबत चर्चा करून, विविध उपाययोजना करत रविवार (ता.३१) पासून बाजार आवार सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा दिवसाआड सुरू ठेवण्यात येणार आहे. अडत्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. फळे भाजीपाला विक्रीची वेळ ही दुपारी वाजेपर्यंतच असणार असून, कमीत कमी गर्दीत व्यवहार करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com