पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर दिवशी सुरू

पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार नियंत्रित गर्दीत सुरू राहणार आहे. तर शनिवार, रविवार हे दोन दिवस संपूर्णपणे बंद राहणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशामुळे शनिवार-रविवार शहरात संपूर्ण टाळेबंदी असणार आहे.
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर दिवशी सुरू
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर दिवशी सुरू

पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार नियंत्रित गर्दीत सुरू राहणार आहे. तर शनिवार, रविवार हे दोन दिवस संपूर्णपणे बंद राहणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशामुळे शनिवार-रविवार शहरात संपूर्ण टाळेबंदी असणार आहे.  नव्या नियमावलीनुसार बाजार समितीमधील भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी, फुले आणि पान विभाग पहाटे ते दुपारी एकपर्यंत सुरू राहणार आहे. तर गूळ-भुसार विभाग सकाळी ९ ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहे. असे बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी कळविले आहे.   कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दिवसाआड एक-एक विभाग सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु स्थानिक महानगरपालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या आदेशानुसार शनिवार, रविवार संपूर्ण टाळेबंदी असल्याने सोमवार ते शुक्रवार ठरलेल्या वेळेत बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, वालचंद संचेती, प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष युवराज काची आदी उपस्थित होते. गर्दी नियंत्रणासाठी हातगाडी, टपरी, हॉटेल बंद बाजार आवारातील गर्दी नियंत्रणासाठी सर्व टपऱ्या, हातगाडे बंद केले आहेत. तसेच हॉटेल्समधून फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी विभागानुसार कर्मचाऱ्यांसह पोलिसांच्या नियुक्त्या केल्या आहेत.  परवानाधारकांना फक्त प्रवेश माल घेऊन येणाऱ्या टेम्पोलाही पास दिला जाणार आहे. त्यामुळे वाहनांचीही गर्दी होणार नाही. गाळ्यावरही सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनाने अडत्यांना दिल्या आहेत. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे, अशांनाच बाजारात खरेदीसाठी परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे कोणालाही बाजारात खरेदीसाठी येता येणार नाही.  प्रतिक्रिया.. खरेदीसाठी मार्केट यार्डातील विविध विभागांत ग्राहकांची गर्दी होत आहे. या गर्दीला आळा घालण्यासाठी किरकोळ खरेदी करणाऱ्यांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे घरगुती किरकोळ खरेदीदार यांनी गर्दी न करता सहकार्य करावे. - मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com