agriculture news in marathi Pune APMC will be closed on Saturday and Sunday | Page 2 ||| Agrowon

पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर दिवशी सुरू

ॲग्रोवन वृत्तसेवा
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार नियंत्रित गर्दीत सुरू राहणार आहे. तर शनिवार, रविवार हे दोन दिवस संपूर्णपणे बंद राहणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशामुळे शनिवार-रविवार शहरात संपूर्ण टाळेबंदी असणार आहे. 
 

पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार नियंत्रित गर्दीत सुरू राहणार आहे. तर शनिवार, रविवार हे दोन दिवस संपूर्णपणे बंद राहणार आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशामुळे शनिवार-रविवार शहरात संपूर्ण टाळेबंदी असणार आहे. 

नव्या नियमावलीनुसार बाजार समितीमधील भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी, फुले आणि पान विभाग पहाटे ते दुपारी एकपर्यंत सुरू राहणार आहे. तर गूळ-भुसार विभाग सकाळी ९ ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू राहणार आहे. असे बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी कळविले आहे.  

कृषी उत्पन्न बाजार समितीकडून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दिवसाआड एक-एक विभाग सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु स्थानिक महानगरपालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या आदेशानुसार शनिवार, रविवार संपूर्ण टाळेबंदी असल्याने सोमवार ते शुक्रवार ठरलेल्या वेळेत बाजार सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला. बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीला दि पूना मर्चंट्‌स चेंबरचे उपाध्यक्ष अशोक लोढा, वालचंद संचेती, प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, रायकुमार नहार, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष युवराज काची आदी उपस्थित होते.

गर्दी नियंत्रणासाठी हातगाडी, टपरी, हॉटेल बंद
बाजार आवारातील गर्दी नियंत्रणासाठी सर्व टपऱ्या, हातगाडे बंद केले आहेत. तसेच हॉटेल्समधून फक्त पार्सल सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी विभागानुसार कर्मचाऱ्यांसह पोलिसांच्या नियुक्त्या केल्या आहेत. 

परवानाधारकांना फक्त प्रवेश
माल घेऊन येणाऱ्या टेम्पोलाही पास दिला जाणार आहे. त्यामुळे वाहनांचीही गर्दी होणार नाही. गाळ्यावरही सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याच्या सूचना बाजार समिती प्रशासनाने अडत्यांना दिल्या आहेत. तसेच ज्यांच्याकडे परवाना आहे, अशांनाच बाजारात खरेदीसाठी परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे कोणालाही बाजारात खरेदीसाठी येता येणार नाही. 

प्रतिक्रिया..
खरेदीसाठी मार्केट यार्डातील विविध विभागांत ग्राहकांची गर्दी होत आहे. या गर्दीला आळा घालण्यासाठी किरकोळ खरेदी करणाऱ्यांना बाजारात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे घरगुती किरकोळ खरेदीदार यांनी गर्दी न करता सहकार्य करावे.
- मधुकांत गरड, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे


इतर अॅग्रो विशेष
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...
भुईमूग खर्चालाही महागअकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
जोरदार पावसाची शक्यता पुणे : मराठवाडा ते मध्य प्रदेशचा मध्य भाग या...
बाजार समित्याबंदमुळे खरीप नियोजन ‘...पुणे: कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन...
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित नगर ः राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल...
साखर कारखान्यांकडून ९२ टक्के ‘एफआरपी’...कोल्हापूर : राज्यात एप्रिलअखेर एकूण रकमेच्या ९२...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत पुणे : राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडत...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
मॉन्सून यंदा वेळेवर पुणे : सध्या मॉन्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक...
शेतकऱ्यांकडे २९ लाख क्विंटल घरचे बियाणे पुणे ः कृषी विभागाने ग्रामबिजोत्पादन मोहिमेतून...
मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी पुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत...
पावसाचा प्रभाव वाढणार पुणे : कर्नाटकाच्या उत्तर भागात चक्रीय वाऱ्याची...
राज्यातील पाणीसाठा ४४ टक्क्यांवर पुणे ः राज्यातील अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला...