agriculture news in marathi, Pune APMCs opens with Police protection | Agrowon

पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती सुरू; नियोजनबद्ध अंमलबजावणी

गणेश कोरे
रविवार, 29 मार्च 2020

पुणे : कोरोना लॉकडाऊन असतानाही बाजार समित्यांत होणाऱ्या गर्दीला अटकाव करण्यात पुणे बाजार समितीला आज (ता.२९) यश आले. अतिशय नियोजनबद्ध, केवळ परवानाधारक शेतकरी आणि विक्रेत्यांना प्रवेश आणि पोलीस बंदोबस्तात आज सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते.

पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही राज्यात बाजार समित्यांत होणाऱ्या गर्दीला अटकाव करण्यात पुणे बाजार समितीला आज (ता.२९) यश आले.  नियोजनबद्ध, केवळ परवानाधारक शेतकरी आणि विक्रेत्यांना प्रवेश आणि पोलीस बंदोबस्तात आज सर्व व्यवहार पार पाडण्यात आले. सुमारे ५५० गाड्यातून आवक होऊन व्यवहार सुरळीत होते. 

तोडणीविना शेतात शिल्लक राहिलेल्या शेतमालाला उठाव मिळावा आणि शहरातील ग्राहकांना भाजीपाला सुरळीत उपलब्ध व्हावा यासाठी पुणे बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने चांगलीच कंबर कसली. कोणत्याही प्रकारची गर्दी टाळत पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने उपायुक्त सुहास बावचे आणि  बाजार समिती प्रशासक बी.जे.देशमुख यांनी बाजार व्यवहार सुरळीत ठेवला. यावेळी केवळ परवानाधारक घाऊक खरेदीदारांना प्रवेश देण्यात आल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवीत सोशल डिस्टनिंगची अंमलबजावणी करण्यात आली होती. 

पुणे बाजार समितीत पोलिस बंदोबस्तात व्यवहार... पहा video

 

आज (रविवारी) सुमारे ५५० लहान मोठ्या वाहनांमधूऩ भाजीपाल्याची आवक झाली होती. आज कांदा-बटाटा आणि फळबाजार विभाग बंद होता. तो उद्या सुरू असेल, तर भाजीपाला विभाग उद्या सोमवारी बंद राहणार आहे. हा प्रयोग दिवसाआड असणार असल्याचे प्रशासक देशमुख यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
रेशीम शेतीतून टाकळीने बांधले प्रगतीचे...यवतमाळ जिल्हयात रेशीम शेतीच्या माध्यमातून आर्थिक...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
प्रवाह सुरळीत झाल्यानंतर मॉन्सूनची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारी (ता....