पुणे बाजार समिती मुख्य आवार रविवारपासून सुरु

पुणे : गुलटेकडी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्यानंतर गेली सुमारे ५० दिवसांपासून बंद असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा विभाग आजपासून (ता.३१) सुरु झाले. कोरोना प्रादुर्भाव आणि फैलाव रोखण्याच्या विविध खबरदारी आणि उपाययोजना करत सुरु केलेल्या बाजार आवारात शेतमालाची आवक आणि खरेदीदार नियंत्रित राहिल्याने व्यवहार सुरळीत होते.
Pune Bazar Samiti main premises started from Sunday

कोरोना विषाणूचा फैलाव शहरात वाढल्यानंतर गुलटेकडी बाजार आवारालगतच्या वसाहतींमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याने हा परिसर बंद करण्यात आला होता. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर बाजार आवार विविध खबरदारी आणि उपाययोजना करत सुरु करण्यात आला. यावेळी प्रत्येकाच्या शरिराची तापमान तपासणी करुनच सॅनिटायझर आणि मास्कच्या वापर करत प्रवेश दिला जात होता. यामुळे रविवारी (ता.३१) केवळ २०० वाहनांमधून सुमारे ११ हजार क्विंटल शेतमालाची आवक झाल्याचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले. 

एक आडतदार, एक गाळा या नियमानुसार गाळे सुरु ठेवण्यात आल्याने गर्दी न उसळता कामकाज सुरळीत पार पडले. दुपारी १२ नंतर सर्व व्यवहार संपले होते. यामुळे बाजार आवारात शुकशुकाट होता. दरम्‍यान, शहरे आणि उपनगरांमधील लहान भाजीपाल्याची मार्केट सुरु केल्याशिवाय मुख्य आवारातील भाजीपाल्याला उठाव मिळणार नाही. यामुळे शहरातील लहान मार्केट सुरु करावी, अशी मागणी कॅन्टोंमेंटमधील कुंभारबावडी बाजाराचे पदाधिकारी संजय क्षिरसागर आणि मिलींद हाके यांनी शहर प्रशासनाकडे केली. 

क्षिरसागर म्हणाले,‘‘ शहरात आणि उपनगरामध्ये पहाटे व्यापारी शेतकऱ्यांकडून अतिशय कमी दराने शेतमाल खरेदी करून जास्त दराने शहरात विक्री करत आहेत. शहरातील मंडईमध्ये मुबलक शेतमाल उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना देखील चांगले दर मिळतील आणि त्यांच्या शेतमालाला उठाव मिळेल.’’ 

आवार आवक (वाहने) क्विंटल 
मुख्य आवार २०० ११ हजार 
मोशी उपबाजार १३५ २ हजार ८११ 
मांजरी उपबाजार १२० हजार 
उत्तमनगर १६. ६० 
एकूण ४७१ १५ हजार ८७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com