Agriculture news in Marathi Pune Bazar Samiti's action against encroachment | Agrowon

पुणे बाजार समितीची अतिक्रमणविरोधी कारवाई

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 7 मे 2021

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या शिवनेरी रस्त्यावरील दोन्ही बाजूंना असणाऱ्या अतिक्रमणधारक फळे, भाजीपाला, हातगाडीवाले, टपऱ्या व विक्रेत्यांवर बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमण कारवाई करत हा रस्ता रिकामा केला.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या शिवनेरी रस्त्यावरील दोन्ही बाजूंना असणाऱ्या अतिक्रमणधारक फळे, भाजीपाला, हातगाडीवाले, टपऱ्या व विक्रेत्यांवर बाजार समिती प्रशासनाने अतिक्रमण कारवाई करत हा रस्ता रिकामा केला. यामध्ये जवळपास चार टन शेतीमाल जप्त करत त्याचा लिलाव समितीकडून करण्यात आला. तसेच या रस्त्यावर रोजच अतिक्रमण कारवाई केली जाणार आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुरक्षारक्षक विभाग, पदाधिकारी, कर्मचारी, वाहतूक पोलिस व महापालिकेचा अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली. या कारवाईत विक्रेत्यांकडून विक्री सुरू असलेला साधारणतः चार टन माल आणि विविध साहित्य जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेला मालाचा लिलाव करण्यात आला. शिवनेरी रस्ता कायमचाच अतिक्रमणमुक्त करण्यासाठी रोजच कारवाई केली जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

शिवनेरी रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कायमच हा रस्ता वाहतूक कोंडीत असतो. कोंडीला अतिक्रमण हेच मुख्य कारण असल्याने रस्ता अतिक्रमणमुक्तीचा निर्धार बाजार समिती प्रशासनाने केला आहे. शहरातून खरेदीला येणारी वाहनेही याच रस्त्याने ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहनाचा ताण आहे.


इतर बातम्या
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
मराठा आरक्षणासाठी एकत्रित लढणारकोल्‍हापूर : इथून पुढील काळात कोणत्याही...
खानदेशात युरियाची टंचाईजळगाव : खानदेशात खरिपास हवी तशी सुरुवातदेखील...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...