पुणे जिल्ह्यातील धरणांत ७० टक्के उपयुक्त साठा

धरणांमध्ये ७० टक्के उपयुक्त पाणीसाठा
धरणांमध्ये ७० टक्के उपयुक्त पाणीसाठा

पुणे : पावसाने आेढ दिल्याने पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची आवक घटली आहे. उजनीसह जिल्ह्यातील धरणांचा एकूण उपयुक्त साठा २१८.४० टीएमसी असूून, गुरुवारी (ता. ९) जिल्‍ह्यातील धरणांमध्ये १५३.४१ (७०.१४ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत काहीसा कमी पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच तारखेला धरणांमध्ये १६६.५५ टीएमसी (७६.२५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता, अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली.  

पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करणाऱ्या उजनी धरणात चल व अचल साठ्यात मिळून गुरुवारी ८१.८१ (७० टक्के) पाणीसाठा होता. यापैकी चल साठ्यामध्ये १८.१६ टीएमसी (३४ टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी याच उजनीमध्ये २५.६१ टीएमसी (४८ टक्के) पाणी उपलब्ध होते. उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील धरणे १०० टक्के भरल्याने त्यातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून, धरणात पाण्याचा येवा सुरू आहे. तर शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी उजनीतून चार हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे.

धरणे ओव्हरफ्लो जिल्ह्यातील पानशेत, खडकवासला, कलमोडी, चासकमान, आंद्रा, पवना ही धरणे १०० टक्के भरून आेव्हर फ्लो झाल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागत आहे. तर पावसाचा जोर अधिक असताना पाण्याची आवक वाढल्याने इतरही धरणांमधून पाणी सोडण्यात आले. कुकडीचे खाेरे वगळता इतर सर्वच नद्यांच्या खोऱ्यांतील बहुतांशी धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. कुकडी खोऱ्यातील धरणांमध्ये ४० ते ६० टक्के पाणीसाठा असून, डिंभे धरण ८६ टक्के भरले आहे. पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा अद्यापही अचल साठ्यात आहे. तसेच नाझरे धरणात ४ टक्के, त्याचबरोबर विसापूर धरणात अवघा ८ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com