पुणे जिल्ह्यातून मूळगावी जाण्याच्या 'पास'करिता 'येथे' करा संपर्क..

पुणे :जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी १५ तहसील कार्यालयांप्रमाणे पाससाठी संपर्क क्रमांक व ई-मेल प्रशासनानेजाहीर केले आहेत.
पुणे जिल्ह्यातून मूळगावी जाण्याच्या 'पास'करिता 'येथे' करा संपर्क..
पुणे जिल्ह्यातून मूळगावी जाण्याच्या 'पास'करिता 'येथे' करा संपर्क..

पुणे : जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी १५ तहसील कार्यालयांतून पास उपलब्धतेसाठी संपर्क क्रमांक व ई-मेल प्रशासनाने जाहीर केले आहेत.  या इ-मेलवर माहिती पाठवून प्रवासासाठी सर्शत पास मिळणे नागरिकांना आता शक्य होणार आहेत.    महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील आदेश क्र. डीएमयु/2020/सीआर/92/एम-1 दि. 30/04/2020 रोजीच्या आदेशान्वये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव लाॅकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार/ पर्यटक/ विद्यार्थी यांना त्यांच्या मुळगावी पाठविणेबाबत आदेश प्राप्त झालेले आहे.

सदर आदेशानुसार परराज्यातील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्याची इच्छा असल्यास महाराष्ट्र शासनाने आवश्यक त्या उपाय योजना करुन कामगारांना मुळ गावी पोहोचविणेकामी वाहतुक व्यवस्था व तदनुषंगिक कार्यवाही करणेबाबत उक्त आदेशान्वये सुचना दिलेल्या असून कामगारांना परत मुळ गावी पाठविणेची परवानगी देणेत आलेली आहे. शासनाने सदर आदेशामध्ये खालील निकष विचारात घेऊन कार्यवाही करणेच्या सुचना दिलेल्या आहे.

  • १. ज्या कामगारांना आपल्या गावी मुळ परत जावयाचे आहे अशा कामगारांनी आपली नाव नोंदणी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांचे कार्यालयाकडे नावनोंदणी इमेलदवारे व दुरध्वनी संदेशादवारे करणेत यावी. 
  • २. ज्या लोकांना हालचाल करावयाची इच्छा आहे अशा लोकांची तपासणी केली जाईल आणि कोव्हीड-१९ लक्षणे किंवा लक्षणे न दर्शविणाऱ्यांनाच मुळ गावी जाणेची परवानगी जिल्हा प्रशासनाकडुन देणेत येईल.
  • ३. पुणे जिल्हयातुन इतरत्र म्हणजे त्यांच्या मुळ गावी पाठविणेत येणाऱ्या कामगारांची वैदयकीय तपासणी करण्यात योईल . आणि त्यांच्यामध्ये कोव्हीड-१९ ची कोणतीही लक्षणे नसल्यासच त्यांना मुळ गावी पाटविणेबाबतची विनंती विचारात घेतली जाईल
  • ४. मुळ गावी पतरणाऱ्या कामगारांची संख्या व त्यांची ठिकाणे विचारात घेऊन वाहतुक आराखडा तयार करणेत येईल. व संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी व राज्य प्रशासनाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर कामगारांना त्यांच्या मुळ गावाकडे रवाना करणेत येईल.
  • ५. सर्व स्थलांतरीत कामगार, विदयार्थी व पर्यटक यांना आव्हान करणेत येते की, त्यांनी कोणतीही घाईगरबड न करता. संबंधित तालुक्याच्या नियंत्रण कक्षाशी दुरध्वनीवरुन अथवा इमेलदवारे आपली नाव नोंदणी करावी.
  • तालुका नियंत्रण कक्ष, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी ची यादी खालीलप्रमाणे

  • तहसील कार्यालय हवेली – 020-24472348 – tahsildarhavelipune@gmail.com
  • अपर तहसील पिंपरी चिंचवड – 020-27642233 – apartahsilpimparichinchwad@gmail.com
  • तहसील कार्यालय पुणे शहर – 020-24472850 – tahasildarpunecity@gmail.com
  • तहसील कार्यालय मावळ – 02114-235440 – tahsilmaval@gmail.com
  • तहसिल कार्यालय मुळशी – 020-22943121 – tehsilmulshi@gmail.com
  • तहसील कार्यालय शिरुर – 02138-222147 – tahsilshirur@gmail.com
  • तहसील कार्यालय भोर – 02113-224730 – tahsilbhor@gmail.com
  • तहसिल कार्यालय वेल्हा – 02130-221223 – tahsilvelhel@gmail.com
  • तहसील कार्यालय पुरंदर – 02115-222331 – tahsildarpurandar@gmail.com
  • तहसील कार्यालय जुन्नर – 02132-222047 – tahsil junnar@gmail.com
  • तहसिल कार्यालय आंबेगाव – 02133-244214 – tahasilambegaonp@gmail.com
  • तहसिल कार्यालय खेड – 02135-222040 – tahsilkhed@gmail.com
  • तहसील कार्यालय दौड – 02117-262342 – tahsildaundl@gmail.com
  • तहसिल कार्यालय इंदापूर – 02111-223134 – indapur tahsil@gmail.com
  • तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 – tahsildarbmt@gmail.com
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com