Agriculture news in Marathi, Pune District Agricultural Farmer, best ​​cow Parents Award Announced | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्हा कृषिनिष्ठ शेतकरी, आदर्श गोपालक पुरस्कार जाहीर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी, शरद आदर्श कृषिग्राम, आदर्श गोपालक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १०) दुपारी १ वाजता पुण्यातील अल्पबचत भवन येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली. 

पुणे : जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी, शरद आदर्श कृषिग्राम, आदर्श गोपालक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १०) दुपारी १ वाजता पुण्यातील अल्पबचत भवन येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापती सुजाता पवार यांनी दिली. 

अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारात जिल्ह्यात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील शंकर नारायण काळे यांना ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरविण्यात येणार आहे. उर्वरित प्रत्येक तालुक्यात निवड झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कारासाठी निवड झालेल्या गावातील सरपंच, ग्रामसेवकांना २१ हजार रुपये स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तर दुग्धोत्पादनात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गोपालकांचाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 

कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारविजेते :
सर्वसाधारण विभाग
शंकर नारायण काळे, काळेवाडी, पो. दिवे (ता. पुरंदर), मुकुंद बबन ठाकर, येळसे, पो. पवनानगर (ता. मावळ), विकास हरिभाऊ चव्हाण, पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर), रवींद्र तुळशीराम तोत्रे, कुरवंडी (ता. आंबेगाव), विलास हरिदास बालगुडे, मुर्टी (ता. बारामती), नीलेश भगवान जुगदर, हातवे बु. (ता. भोर), सुहास ज्ञानदेव जगदाळे, लिंगाळी (ता. दौंड), दशरथ लक्ष्मण गायकवाड, वडकी (ता. हवेली), विजयकुमार बाबूराव घोलप (ता. इंदापूर), नवनाथ शंकर दरेकर, पाईट, (ता. खेड), गुलाब सदू कोंढरे, कोंढूर, पो. मुठा (ता. मुळशी), वैशाली सुनील जगताप, मांडवगण फराटा (ता. शिरूर), गंगाराम भिकाजी शिर्के, पाल बु.,पो. गुंजवणे (ता. वेल्हे) 

आदिवसी गट 
कांताराम लुमाजी लोहकरे, तेरुंगण (ता. आंबेगाव), सुरेश नाना कशाळे, डेहणे (ता. खेड), नामदेव गेनभाऊ जाधव निमदरी (ता. जुन्नर).

आदर्श गोपालक पुरस्कार विजेते
बाळू लक्ष्मण औटी, राजुरी (ता. जुन्नर), भरत मारुती फदाले, फदालेवाडी (ता. आंबेगाव), पोपट गणपत माहिते, गोनवाडी (ता. खेड), नितीन सोपान कुंजीर, वळती (ता. हवेली), नाथा शंकर पिंगळे, साई (ता. मावळ), दिलीप उत्तमराव दगडे, शेरे (ता. मुळशी), यशवंत गोविंद पोळेकर, पालखुर्द (ता. वेल्हे), अशोक रोहिदास लेकावळे, मोहरी बु. (ता. भोर), रोहिदास सदाशिव मेमाणे, पारगाव (ता. पुरंदर), महेश अनंतराव गाडे, कोऱ्हाळे बु. (ता. बारामती), सतिश दशरथ मोरे, मानकरवाडी (ता. इंदापूर), विनोद जयसिंग कोडीतकर, जावजीबुवाची वाडी (ता. दौंड), संभाजी काळूराम भुजबळ, कासारी (ता. शिरूर).  

आदर्श कृषी ग्राम पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायती : 
पोंदेवाडी (ता. आंबेगाव), माळेगाव खुर्द (ता. बारामती) कामथडी (ता. भोर), देलवडी (ता. दौंड), आर्वी (ता. हवेली), पवारवाडी (ता. इंदापूर), डिंगोरे (ता. जुन्नर), सातकरस्थळ (ता. खेड), भोयरे (ता. मावळ), आंदगाव (ता. मुळशी), मांडकी (ता. पुरंदर), आंबाळे (ता. शिरूर), पाल बु. (ता. वेल्हे).

इतर बातम्या
नगर जिल्ह्यात ज्वारीची पावणे तीन लाख...नगर : जिल्ह्यामधील बहुतांश भागात गेल्या आठ...
साताऱ्यात जोरदार पावसाने स्ट्रॉबेरीचे...सातारा : जिल्ह्यात अनेक ठिकाणी परतीच्या...
कर्जत- जामखेडमध्ये सर्वांची प्रतिष्ठा...नगर : दोन वेळा मतविभागणीमुळे पालकमंत्री राम शिंदे...
मराठवाड्यात ११० मंडळांत पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ पैकी ११०...
मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे...कोळवण : मुळशी तालुक्यात परतीच्या पावसामुळे...
परभणी येथील दुग्धशाळेतील दूध संकलनात घटपरभणी : शासकीय दूध योजनेतंर्गंत येथील दुग्ध...
मराठवाड्यातील ५३१ गावांत, वाड्यांत...औरंगाबाद : मराठवाड्यातील ५३१ गावे-वाड्यांची तहान...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड  : विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड,...
मनमाड बाजार समितीमध्ये नवीन मका विक्री...नाशिक : नांदगाव तालुक्यात मका काढणीला सुरवात झाली...
खरीप मळण्यांना पावसाचा फटकाकोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात...
शेतकरीकन्या मंजूषा पगारची भारतीय बेसबॉल...नाशिक : मालेगाव तालुक्यातील विराणे येथील शेतकरी...
खानदेशात ज्वारीची दिवाळीपूर्वी कापणी...जळगाव ः शासनाकडून भरडधान्य म्हणजेच ज्वारी, मका...
व्यापाऱ्यांकडून मुगाची कमी भावाने खरेदीनांदुरा, जि. बुलडाणा : पावसाने उघडीप दिल्याने...
‘पंदेकृवि’मध्ये जागतिक कापूस दिन साजराअकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात...
तरुणांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड...सोलापूर ः ‘‘उद्योजकता प्रशिक्षणातून शेतीपूरक...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सोयाबीन उत्पादनासाठी गंधकाचा वापर...अकोला ः शेतातील काडी कचरा न जाळता खत...
को-मार्केटिंगची पायाभरणी करणारा माजी...पुणे : "राज्यातील शेतकऱ्यांना को-मार्केटिंगच्या...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...