Agriculture news in marathi In Pune district, crop loan will be repaid at 6% interest | Agrowon

पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा टक्के व्याजाने परतफेड

टीम अॅग्रोवन
रविवार, 27 सप्टेंबर 2020

पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने व्याज पीक कर्ज पुरवठा केला जातो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना आता पूर्ण सहा टक्के व्याजाने परतफेड करावी लागणार आहे.

पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने व्याज पीक कर्ज पुरवठा केला जातो. मात्र, यासाठी शेतकऱ्यांना आता पूर्ण सहा टक्के व्याजाने परतफेड करावी लागणार आहे. व्याजाची सवलत थेट लाभ हस्तांतरणानुसार (डीबीटी) नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती जिल्हा बॅंकेच्या सूत्रांनी दिली.

केंद्र व राज्य शासनाच्या निणर्यानुसार प्राथमिक शेती सहकारी संस्थांच्या शेतकरी सभासदाना बँकेमार्फत सहा टक्के व्याजदराने पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. पीककर्जाची ३६५ दिवसांत वेळेवर परतफेड करणाऱ्या सभासदांना तीन लाखापर्यंतच्या रकमेसाठी केंद्र शासनाकडून तीन टक्के, तर राज्य शासनाकडून एक टक्का व्याज सवलत मिळते. जिल्हा बँक स्वत:च्या नफ्यातून सभासदांना आणखी दोन टक्के सवलत देत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना शुन्य टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध होते.केंद्र व राज्य सरकारकडून सवलत रक्कम एक ते दीड वर्षांनी मिळते.

तरीही त्याची वाट न पाहता जिल्हा बँक सर्व व्याज सवलतीचा लाभ सभासदांना देते. तीन लाखापर्यंत शून्य व्याज सवलतीचा लाभ देणारी पुणे जिल्हा बँक देशातील एकमेव बँक आहे. चालू २०२०-२१ थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) पध्दतीचा अवलंब करण्यात येणार आहे. कर्जदार शेतकरी सभासदांच्या बचत खात्यावर व्याज सवलतीची रक्कम वर्ग करण्यात येणार असल्याचे शासनाने
कळविले आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील सभासद शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्जवाटप केले जाते. मात्र, यापुढे प्रथम व्याजासहित पीककर्जाची परत फेड करावी लागणार आहे. शासनाकडून शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर व्याज सवलतीची रक्कम नंतर जमा केली जाईल. शून्य टक्के व्याजाच्या सवलतीचा लाभ शेतकरी सभासदांना पूर्वी प्रमाणेच मिळेल.
 - प्रतापसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा बॅंक.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...