Agriculture news in Marathi, Pune district in dam area heavy rain | Agrowon

पुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

पुणे ः गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. बुधवारी (ता. ३१) पावसाच्या धरणपट्ट्यात चांगल्याच जोरदार सरी पडल्या. भोर तालुक्यातील भोलावडे येथे १५१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहत असून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. तर येडगाव, चासकमान, खडकवासला व वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांच्या भात लागवडी अंतिम पट्ट्यात आल्या आहेत. 

पुणे ः गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाचा जोर अजूनही कायम आहे. बुधवारी (ता. ३१) पावसाच्या धरणपट्ट्यात चांगल्याच जोरदार सरी पडल्या. भोर तालुक्यातील भोलावडे येथे १५१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामुळे ओढे, नाले खळाळून वाहत असून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. तर येडगाव, चासकमान, खडकवासला व वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने शेतकऱ्यांच्या भात लागवडी अंतिम पट्ट्यात आल्या आहेत. 

गुरुवारी पावसाचा जोर या भागात काही प्रमाणात कायम होता. मात्र, पूर्वेकडील भागात पावसाने उघडीप दिली होती. पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक १३०, तर वरसगाव ११५ मिलिमीटर पाऊस पडला. वडीवळे, पवना, मुळशी, टेमघर, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर या धरणांच्या परिसरातही जोरदार पाऊस पडला. तर खडकवासला, कासारसाई, वीर, नाझरे, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चासकमान या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. घोड आणि विसापूर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस पडला आहे. 

पुणे शहरातील कोथरूड येथे सर्वाधिक ३० मिलिमीटर पाऊस पडला. तर केशनगर, खडकवासला, खेड, भोसरी या भागांतही हलका पाऊस पडला. मुळशी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कायम होता. तर मुठे, माले, पौड येथे सर्वाधिक पाऊस पडला. भोर तालुक्यातील भोर, भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर, मावळातील काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे जोरदार पाडऊ पडला. वेल्हा तालुक्यातील वेल्हा, पाणशेत, विंझर, आंबवणे, जुन्नरमधील राजूर, डिंगोरे, आपटाळे, ओतूर, खेडमधील वाडा, कुडे, पाईट, आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, मंचर येथे जोरदार पाऊस पडला. पूर्वेकडील तालुक्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली होती. काही ठिकाणी अधूनमधून सरी बरसता होत्या.

शिरूरमधील टाकळी, तळेगाव, पाबळ, बारामतीमधील बारामती, माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, मोरगाव, इंदापूरमधील भिगवण, इंदापूर, दौंडमधील वरवंड, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, जेजुरी, परिंचे, वाल्हा या ठिकाणी हलक्या सरी पडल्या.

मंडळनिहाय झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः
पुणे शहर ६.३, केशवनगर ४.२, कोथरूड ३०, खडकवासला ९, थेऊर ८, उरूळी कांचन ३, खेड १५, भोसरी ९, चिंचवड १०, कळस ३, हडपसर ३, वाघोली ४, पौड ४६, घोटावडे ४०, थेरगाव १०, माले ७४, मुठे ७९, पिरंगुट ४५, भोर ३३, भोलावडे १५१, नसरापूर ३१, किकवी ४५, वेळू २१, आंबवडे ३८, संगमनेर ६५, निगुडघर ६५, वडगाव मावळ १०, तळेगाव १०, काले ६३, कार्ला ४३, खडकाळा ३१, लोणावळा ६२, शिवणे ४८, वेल्हा ४०, पाणशेत ७७, विंझर २१, आंबवणे १७, जुन्नर ६, नारायणगाव ६, वडगाव आनंद ६, निमगाव सावा ४, बेल्हा ३, राजूर ६०, डिंगोरे ५३, आपटाळे २४, ओतूर २३, वाडा ५१, राजगुरुनगर १, कुडे ४०, पाईट १०, चाकण ३, पिंपळगाव १.५, कन्हेरसर २, कडूस १०, घोडेगाव ३५, आंबेगाव २०, कळंब १५, पारगाव ६.७, मंचर १३, टाकळी २, तळेगाव २, पाबळ ३, बारामती २, माळेगाव २, पणदरे २, वडगाव ५, लोणी १, मोरगाव ६, भिगवण १, इंदापूर ०.२, वरवंड १, सासवड ७, भिवंडी १३, जेजुरी ३, परिंचे २१, वाल्हा ७.


इतर बातम्या
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’...माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
विदर्भात गारपिटीची शक्यतापुणे ः पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांद्यानंतर 'या' पिकावर साठा मर्यादा...नवी दिल्ली: देशात यंदा कडधान्याचे उत्पादन...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
‘पीजीआर’साठी जाचक नियमावली नकोपुणे : बिगर नोंदणीकृत जैव उत्तेजकांना (...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...