पुणे : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई द्या

pune district damaged crop compensation
pune district damaged crop compensation

पुणे ः इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागात गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी वादळी पाऊस झाला. यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, मका, द्राक्षे व डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून आली आहे.    

गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी नगर, औरंगाबाद यांसह पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील अनेक भागात पाऊस झाला. या भागातील डाळिंब, द्राक्षे फळबागांचे नुकसान झाले आहे. डाळिंब बागा ज्या शेतकऱ्यांनी बहार धरला होता. त्या बागेची फूल व काही प्रमाणात फळ या अवकाळी पावसामुळे गळून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा ज्वारी पिकांची काही ठिकाणी काढणी चालू आहे. तर काही ठिकाणी पिके काढणीला आली आहेत. 

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. तालुक्यातील बहुतांशी भागात झालेल्या वादाळामुळे व पावसामुळे नुकसान झाले आहे. येणाऱ्या काळातही बदल झाल्यास नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अशीच स्थिती राहिल्यास गहू, हरभरा, ज्वारी या पिकांच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, कृषी विभागाने झालेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून शासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्याकडेही जवळपास सत्तर एकरावर डाळिंब, द्राक्षाची बाग आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस झाला. यामुळे डाळिंबाची फुलगळ झाली. तर द्राक्षाच्या मण्याला तडे गेले आहे. त्यामुळे चांगलेच नुकसान झाले आहे. या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. - अतुल शिंगाडे, प्रगतशील शेतकरी, शेळगाव, ता. इंदापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com