Agriculture news in Marathi, In Pune district, the loss rates punchnama are slow | Page 2 ||| Agrowon

पुणे जिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे धीम्या गतीने
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पुणे ः निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, हवेली, भोर तालुक्यांतील अनेक भागांत अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठ्यांची गावात नसलेली उपस्थिती यामुळे अनेक भागांत पंचनामे धीम्या गतीने सुरू आहेत. शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी कृषी सहायकांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, वेळेवर पंचनामे न झाल्यास अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.  

पुणे ः निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे पुणे जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, हवेली, भोर तालुक्यांतील अनेक भागांत अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठ्यांची गावात नसलेली उपस्थिती यामुळे अनेक भागांत पंचनामे धीम्या गतीने सुरू आहेत. शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी कृषी सहायकांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असून, वेळेवर पंचनामे न झाल्यास अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.  

अतिपावसामुळे पिकांचे नुकसान होऊन महिना होत आला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, निवडणुकीमुळे कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्याची नसलेली उपस्थिती यामुळे अखेर पंचनाम्यासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक कृषी सहायक पंचनाम्यासाठी फिरत असले तरी, त्याची संख्या पाहता पंचनाम्यासाठी वेळ लागत आहे. अनेक भागात अजूनही पंचनामे सुरू झालेले नाही. काही भागांत पंचनामे सुरू झाले असले तरी, गती पाहता अत्यंत धीम्या गतीने पंचनामे सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे वेळेत पंचनामे सुरू होऊन नुकसानभरपाई मिळेल की नाही अशी साशंकता शेतकऱ्यांना आहे.

मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यातील भातखाचरांत अतिपाणी झाल्याने अनेक ठिकाणी बांध फुटले. त्यामुळे भाताचे अनेक भागांत नुकसान झाले. बारामती, हवेली, भोर, वेल्हा या तालुक्यांतही अतिपावसामुळे अनेकांची पिके पाण्याखाली गेली. यामुळे बाजरी, मूग, वाटाणा, उडीद, सोयाबीन या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली. 

जिल्ह्यात कोरडवाहू आणि बागायती असे एकूण दोन लाख ९३ हजार २१६ हेक्टर क्षेत्र आहे. अतिपावसामुळे सुमारे तीन हजार १७७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाने घेतलेल्या नजरअंदाजाच्या अहवालावरून माहिती पुढे आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी तहसीलदारामार्फत पंचनामे करून तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु पुरंदर, बारामती, हवेली भोर आणि वेल्हा तालुक्यांच्या अनेक भागांत अजूनही पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे हे पंचनामे केव्हा होतील, असा प्रश्न शेतकऱ्यांमाधून विचारण्यात येत आहे.

इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत शेतीसाठी तण व्यवस्थापन आवश्यकतणांकडे आजवर आपण सर्वांनी एखाद्या शत्रूसारखे...
नगरमध्ये टोमॅटो ५०० ते २००० रुपये...नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता...
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...