पुणे जिल्हा दूध संघाची उद्यापासून विक्रीदरात दोन रुपयांची वाढ

पुणे जिल्हा दूधसंघाची दरवाढ गुरुवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ
पुणे जिल्हा दूधसंघाची दरवाढ गुरुवारपासून प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ

पुणे  ः जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज) गाय आणि म्हशीच्या दुधाच्या विक्रीदरातील प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ गुरुवारपासून (ता.६) अमलात येणार आहे. या दरवाढीच्या अंमलबजावणीमुळे ग्राहकांना गायीचे (टोण्ड) दूध प्रतिलिटर ४८ रुपये, प्रमाणित दूध ५४ रुपये, तर मलई दूध आणि म्हशीचे दूध ५८ रुपये लिटरने खरेदी करावे लागणार आहे.  सध्या गाईच्या दुधाचा विक्री दर प्रतिलिटर ४६, तर म्हशीच्या दुधाचा ५६ रुपये लिटर आहे. राज्यातील सर्व खासगी व सहकारी दूध उत्पादक संघांच्या डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी एक जानेवारी २०२० पासून अमलात आणण्याचेही ठरले होते. त्यानुसार राज्यातील अनेक दूध संघांनी १ जानेवारीपासून दरवाढ लागू केली आहे. मात्र, कात्रज डेअरीने दरवाढ अमलात आणली नव्हती. त्यामुळे हा निर्णय जुनाच असून, त्याची केवळ अंमलबजावणी गुरुवारपासून (ता. ६) केली जात आहे, असे खासगी व सहकारी दूध कल्याणकारी संघाचे खजिनदार डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com