पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे १९ हजार २१७ क्विटंल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाण्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.   पुरेसा पाऊस न पडल्याने जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवर होणार असल्याने पेरणीचे क्षेत्रात काही प्रमाणात घट होणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी तीन लाख ९८ हजार ६५० हेक्‍टर क्षेत्र आहे. कृषी विभागाने दोन लाख ८८ हजार ७७० हेक्‍टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये रब्बी ज्वारी सर्वाधिक दोन लाख ४६ हजार ९२४ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ६३ हजार ८५४ हेक्‍टर क्षेत्र आहे. हरभऱ्याचे ५८ हजार ४२६ हेक्‍टर क्षेत्र आहे. त्यासाठी सुमारे दोन लाख २८ हजार १८ टन खताची, बियाण्यांची १९ हजार २१७ क्विटंलची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.   गेल्या वर्षी रब्बी हंगामात सुमारे १८ हजार ५४६ क्विटंल बियाणांची विक्री झाली होती. त्याच धर्तीवर चालू वर्षीही कृषी विभागाने बियाणांचे नियोजन केले आहे. यंदा महाबीजमार्फत सुमारे ९८९९ क्विंटल बियाणांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी कंपन्याकडून आठ हजार ४६९ क्विंटल, उर्वरित बियाणांचा पुरवठा राष्ट्रीय बीज निगमकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामात बियाणांची अडचण भासणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.   रब्बी हंगामासाठी बियाणांची केलेली मागणी (क्विंटलमध्ये)  पीक (बियाणे)  : ज्वारी १७००,  गहू १२,७००, हरभरा    ३९९०, सूर्यफूल १ , करडई १, मका ४७२, वाटाणा ३५३,     एकूण १९,२१७ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com