पुणे जिल्ह्यात एक लाख ५५ हजार हेक्टरवर पेरण्या

पुणे जिल्ह्यात एक लाख ५५ हजार हेक्टरवर पेरण्या
पुणे जिल्ह्यात एक लाख ५५ हजार हेक्टरवर पेरण्या

पुणे : पावसाच्या खंडामुळे खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. खरिपात उशिराने सुरू झालेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडिद या पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून, भाताच्या पुनर्लागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात दोन लाख ३० हजार ८३० हेक्टरपैकी एक लाख ५५ हजार ८०७ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

 सरासरी ६७ टक्के पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यात भात पिकांची ६१ हजार ७८३ हेक्टरवर पुनर्लागवड झालेल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे भात पीक वाढीच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी पुनर्लागवडी अंतिम टप्प्यात आल्या आहेत.

भोर, वेल्हा, मावळ या तालुक्यांत यंत्राच्या सहाय्याने ५९२ हेक्टरवर भात लागवड पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन केले होते. बाजरी पीक वाढीच्या अवस्थेत असून शिरूर, दौड, इंदापूर, बारामती व पुरंदर या तालुक्यामध्ये पावसाअभावी पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. जूनच्या सुरवातीच्या काळात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे मूग व उडिद या पिकांची पेरणी क्षेत्र कमी झाले आहे.

सुरवातीस पेरलेले मूग पीक फुलोऱ्यांच्या अवस्थेत असून शिरूर तालुक्यात काही ठिकाणी पावसाअभावी वाढीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. भुईमूग पीकवाढीच्या अवस्थेत आहेत. सोयाबीन पिकांचे सरासरी पाच हजार २०० हेक्टर क्षेत्र असून हे क्षेत्र भोर, जुन्नर, खेड, आंबेगाव व बारामती तालुक्यांमध्ये आहे. जिल्ह्यामध्ये १८ हजार ७६६ हेक्टरवर सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे.

सोयाबीन पिके वाढीच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिकांवर अल्प प्रमाणात पाने खाणारी अळी, चक्री भुंगे यांचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभागामार्फत योग्य त्या उपाययोजना सुचविल्या जात आहेत. मका पिके वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकांची शिरूर, बारमती, इंदापूर, दौड या तालुक्यांमध्ये अवघे ४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com