Agriculture news in Marathi pune district in Rabi season 1910 crop harvest experiment | Agrowon

पुणे जिल्ह्यात रब्बीत १९१० पीककापणी प्रयोग

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 जानेवारी 2020

पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी पीककापणी प्रयोग घेण्यात येणार आहे. चालू वर्षी रब्बी हंगामात पीकविमा योजना मंडळ, मंडळ गटामध्ये प्रत्येक पिकांसाठी किमान बारा प्रयोग घेणे अनिवार्य आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण एक हजार ९१० पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी पीककापणी प्रयोग घेण्यात येणार आहे. चालू वर्षी रब्बी हंगामात पीकविमा योजना मंडळ, मंडळ गटामध्ये प्रत्येक पिकांसाठी किमान बारा प्रयोग घेणे अनिवार्य आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण एक हजार ९१० पीक कापणी प्रयोग घेण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

रब्बी हंगाम २०१९-२० अंतर्गत पुणे जिल्ह्यात पीककापणी प्रयोग हे पीकविमा नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे पीककापणी प्रयोग अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. पीक कापणीचे प्रयोग विहित कालमर्यादेत पूर्ण करून त्याची माहिती पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत केंद्र शासनास सादर केली जाते. 

पीककापणी प्रयोग महसूल ग्रामविकास व कृषी या तिन्ही यंत्रणांमार्फत करण्यात येते. पिकांची उत्पन्नाची आकडेवारी कृषी विभागाला अचूक व वेळेवर उपलब्ध होण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे नियोजन, अंमलबजावणी आणि पर्यवेक्षणासाठी प्रत्येक तालुक्यात समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीमध्ये तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका विकास अधिकारी ग्रामीण बॅंकेचे तालुक्याचे बॅंक प्रतिनिधी, विमा प्रतिनिधी आहेत. तसेच ग्राम स्तरावर समिती स्थापन करण्यात येते. त्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, विमा प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी सदस्य आहेत. 

पीककापणीच्या वेळेस ग्रामस्तरीय समितीमध्ये सदस्य उपस्थित राहणे आवश्यक आहे. पीककापणी प्रयोगासाठी मोबाईल अॅप बंधनकारक आहे. पीकविमा योजना मंडळ, मंडळ गटात प्रत्येक पिकांसाठी किमान बारा प्रयोग, तालुका, तालुका गट स्तरावर सोळा प्रयोग घेणे अनिवार्य आहे. पुणे जिल्ह्यात एकूण एक हजार ९१० एवढे प्रयोग असून, त्यापैकी महसूल विभागाने ४०२, जिल्हा परिषदेने ६०० आणि कृषी विभागाने ९०८ प्रयोग घेणे बंधनकारक आहे. 

पीक कापणी प्रयोगासाठी पुणे जिल्ह्यात मुख्य पिकांची एकूण दोन लाख ११ हजार ७६२ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच २ हजार ६६७ शेतकऱ्यांनी एक हजार ४२८ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा काढला आहे.


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...