पुणे जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच

पुणे जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच
पुणे जिल्ह्यात पावसाची रिमझिम सुरूच

पुणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारीही जिल्ह्यात ढगाळ हवमानासह ऊन, सावल्यांपाठोपाठ पावसाची रिमझिम सुरूच होती. सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पश्‍चिम भागात जोरदार, तर पूर्व भागात हलक्या पावसाने हजेरी लावली अाहे. धरणांमधून पाण्याचा विसर्गही सातत्याने सुरू अाहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा जाेर सर्वाधिक असून, मुळशीतील मुठे येथे ७४ मिलिमीटर पाऊस पडला, तर अनेक ठिकाणी २० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पूर्व भागातील शिरूर, इंदापूर तालुक्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. पश्‍चिम भागातील पाऊस भातपिकांच्या वाढीसाठी पोषक ठरणार आहे. तर उर्वरित भागात खरिपाच्या पिकांना हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.

सोमवारी (ता. २७) खडकवासला धरणाच्या सांडवा आणि कालव्यातून सुमारे २० हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते, तर वीर धरणातून नीरा नदीत २३ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मुळशी, वरसगाव धरणातून प्रत्येकी सुमारे ८ हजार क्युसेक, घोड धरणातून चार हजार क्युसेेक, भाटघर, पानशेत, चासकमान धरणातून तीन हजार क्युसेक, नीरा देवघर, पवना आणि डिंभे धरणांमधून पाणी सोडण्यात येत होते.

पावसाची २४ तासांतील अाकडेवारी सोमवारी (ता. २७) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये जिल्ह्यात पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) : पाैड २५, घोटावडे २९, माले ३३, मुठे ७४, पिरंगुट ३६, भोलावडे ३४, नसरापूर ३२, आंबवडे २९, संगमनेर २०, निगुडघर ४७, काले ६०, लोणावळा २५, शिवणे २१, वेल्हा ४९, पानशेत ४४, विंझर ३१, आपटाळे ४०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com